Pune Crime: पुणे हादरले! ९ वर्षांच्या दोन मुलींवर बलात्कार, सावत्र भावानेच केलं भयंकर कृत्य

Crime News Pune: पुण्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. धनकवडी आणि कोंढवा परिसरात या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Pune Crime
Pune Crime Saam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये ९ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे हादरले आहे. पहिली घटना धनकवडीमध्ये घडली तर दुसरी घटना कोंढव्यामध्ये घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर आणि कोंढवा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये विनयभंग आणि बलात्कार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एका घटनेत सावत्र भावानेच आपल्या बहिणीवर बलात्कार केला.

पुण्याच्या सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडीमध्ये एका ९ वर्षांच्या मुलीवर तरुणाने लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करून तिला जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारदारावरून धनकवडी येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime
Sangli Crime : पोटच्या लेकाचा आगीत होरपळून मृत्यू; नंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर

तर दुसरी घटना कोंढवा खुर्द परिसरात घडली. एका ९ वर्षांच्या मुलीवर तिच्या सतरा वर्षांच्या सावत्र भावाने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सावत्र भावाविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कोंढव्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Pune Crime
Pune Crime : नवरा मध्यरात्री राक्षस झाला, बायकोला गळा दाबून संपवले, मृतदेह दुचाकीवर नेताना बिंग फुटले

दरम्यान, विशेष मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे आणि विनयभंग करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला न्यायालयाने ५ वर्षे सत्ता मजुरी, २ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागेल असे न्यायालयाने सांगितले.

दीपक सुधीर मंडल (२८ वर्षे, राहणार. आसाम) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी पीडित घराच्या ओट्यावर बसली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला आणि तिला मिठी मारली.आरोपीने अश्लील स्पर्श करत मुलीचा विनयभंग केला होता.

Pune Crime
Pimpri-Chinchwad Crime : ऑफलाईन गेमवरुन लहान भावाचा वाद, मोठा भाऊ जाब विचारायला गेला असता नाहक बळी; पुण्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com