Sangli Crime : पोटच्या लेकाचा आगीत होरपळून मृत्यू; नंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर

Sangli Murder News : एका आईने आपल्या मुलीसोबत मिळून आपल्याच मुलाची निर्घृण हत्या करत आगीत मृत्यूमुखी पडल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या तासगाव मध्ये घडला आहे.
Sangli Tasgaon Mother and sister kill their own son
Sangli Tasgaon Mother and sister kill their own sonSaam Tv News
Published On

विजय पाटील, साम टिव्ही

सांगली : सांगलीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका आईने आपल्या मुलीसोबत मिळून आपल्याच मुलाची निर्घृण हत्या करत आगीत मृत्यूमुखी पडल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या तासगाव मध्ये घडला आहे. १९ वर्षीय मयूर माळी या मुलाला त्याची आई संगीता माळी आणि बहीण काजल माळी, या दोघी मायलेकींनी मिळून गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळत, घरात आग लागून मृत्युमुखी पडल्याचा बनाव केला. मात्र, तासगाव पोलिसांनी मायलेकींच्या हत्येच्या बनावाचा पर्दाफाश करत दोघींना बेड्या ठोकल्या आहेत.

मुलाकडून होणारी मारहाण त्रासाला कंटाळून चक्क आईनेच मुलाची हत्या करणे त्यात बहिण सहभागी असणं अशा प्रकाराने खळबळ उडाली. हत्या करून मुलाचा भाजून मृत्यू झाल्याचा केलेला बनाव पोलिसांनी अवघ्या काही तासात उघडकीस आणला. तासगावमधील पेठ कासार गल्ली परिसरात मयूर रामचंद्र माळी हा युवक आई-वडील दोन बहिणींसोबत राहत होता.

Sangli Tasgaon Mother and sister kill their own son
India vs Pakistan Tension : युद्धाचे ढग गडद, पाकिस्तानला अद्दल घडवणार; दिल्लीत घडामोडींना वेग

शनिवारी घरातून धूर येऊ लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. घरातील जळालेलं साहित्य आणि मयुरचा होरपळलेल्या अवस्थेत संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. घरातील जळालेलं साहित्य, मयुरच्या डोक्यात झालेल्या जखमा, घरात पसरलेलं रक्त यावर या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी मयूरची आई संगीता आणि बहीण काजल यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक पुन्हा हादरलं

दरम्यान, नाशिकमध्ये देखील एख हत्येची बातमी समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर परिसरात एका इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदरची घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसात तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

नाशिकच्या सातपुर परिसरातील प्रबुद्ध नगरात एका ४५ वर्षीय इसमाचा मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रबुद्ध नगरात परीसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका ४५ वर्षेीय मृतावस्थेत पडलेला होता. मध्यरात्रीच्या अंधारात हा प्रकार कुणाला कळला नाही. मात्र आज दिवस उजाडल्या नंतर येथून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला इसम दिसल्याने घटना उघडकीस आली.

Sangli Tasgaon Mother and sister kill their own son
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणींना २१०० देता येणार नाहीत', महायुती सरकारमधील नेत्यानं स्पष्टच सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com