Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणींना २१०० देता येणार नाहीत', महायुती सरकारमधील नेत्यानं स्पष्टच सांगितलं

Minister Sanjay Shirsat Expresses Frustration Over Fund Allocation: २१०० रूपयांच्या मुद्द्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडक्या बहिणींना १५०० चे २१०० देता येणार नाही, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असं शिरसाट म्हणाले.
Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar
MahayutiSaam
Published On

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहीट ठरली. विधानसभा निवडणुकीआधी ही योजना सुरू झाली आणि अजूनही अविरत सुरू आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यात १५०० रूपयांवरून २१०० रूपये अनुदान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. महायुतीचं सरकार येऊन ६ महिने उलटले, अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं, मात्र तरीही लाडक्या बहिणींचा २१०० रूपयांचा प्रश्न अनुत्तरीत आहे. २१०० रूपयांच्या मुद्द्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडक्या बहिणींना १५०० चे २१०० देता येणार नाही, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असं शिरसाट म्हणाले.

लाडकी बहीण योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी २ खात्यातील पैसे वळवण्यात आल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून सामाजिक आणि आदिवासी विकास खात्याला योग्य निधी मिळत नसल्याचा दावा शिरसाट यांनी केला होता. यावरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेच्या २१०० रूपयांच्या मुद्द्यावरून शिरसाट यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar
12th HSC Result : अभिनंदन! बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी

'फेब्रुवारीमध्ये त्यांना यासंबंधीत फाईल मिळाली होती. त्यावेळेच त्यांनी स्पष्ट लिहून दिलं होतं की, पैसे देणं शक्य नाही. सरकारवर लाडकी बहीण योजनेचं बर्डन आहे. अजित पवार हे जाणीवपूर्वक करत असतील असं मला वाटत नाही, त्यांना गाईड करणारा चुकीचं ब्रीफ करत असणार', असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसेच १५०० चे २१०० रूपये करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. ती स्वीकारावीच लागेल', असं शिरसाट म्हणाले.

Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar
Nagpur: हळदीच्या कार्यक्रमात राडा, दारूच्या नशेत महिला अन् पुरूषांचा धिंगाणा; हाणामारीत २ चिमुकले गंभीर जखमी

मी मुंबईत स्वतःच्या घरात राहतो, मला तर बंगलाही नाही

लाडकी योजनेसाठी आपल्या खात्याचा निधी इतर विभागात वळवल्याबाबत मंत्री संजय शिरसाठ यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. या वक्तव्यानंतर शिरसाट यांनी पुन्हा आपल्या मनातील खदखद वक्त केलीय. 'तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्यावर किती अन्याय झालाय. मला तर मलबार हिल भागात बंगलाही मिळाला नाही, मी मुंबईत स्वतःच्या घरात राहतो', असं शिरसाट म्हणाले.

Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar
12th HSC Result: संतोष देशमुखांची लेक झाली पास! बारावीला मिळाले इतके गुण, कुटुंबियांचे डोळे डबडबले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com