Pune Crime : नवरा मध्यरात्री राक्षस झाला, बायकोला गळा दाबून संपवले, मृतदेह दुचाकीवर नेताना बिंग फुटले

Pune Nanded City murder case : पुण्यातील नांदेड सिटीमध्ये नवऱ्याने मध्यरात्री बायकोचा गळा दाबून खून केला. मृतदेह दुचाकीवर नेताना पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
husband killed wife Pune Nanded City
Pune Crime : नवरा राक्षस झाला, मध्यरात्री बायकोला गळा दाबून संपवले, मृतदेह दुचाकीवर नेताना बिंग फुटलेSaam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune husband killed wife: पुण्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. पतीने मध्यरात्री बायकोचा गळा दाबून खून केला. त्यानंतर हे कृत्य लपवण्यासाठी योजना आखली. पण त्याचं बिंग फुटले. आरोपी नवरा मृतदेह दुचाकीवर नेत होता, त्यावेळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी नांदेड सिटी अन् आंबेगाव परिसरात पसरली अन् एकच खळबळ उडाली.

पुण्यातील नांदेड सिटी परिसरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. आरोपी पती राकेश रामनायक निसार याने आपली पत्नी बबिता राकेश निसार हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह दुचाकीवरून नेत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

husband killed wife Pune Nanded City
Monsoon : आनंदवार्ता! २ आठवडे आधीच मान्सून केरळमध्ये धडकणार, मुंबईत कधी कोसळणार पाऊस?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश मृतदेह घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांच्या गस्ती पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले. तपासणीत बबिताचा मृतदेह आढळून आला आणि खूनाचा प्रकार उघडकीस आला. राकेशने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

husband killed wife Pune Nanded City
12th HSC Result : धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाले, १७ वर्षांच्या मुलीने आयुष्य संपवलं

खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा नोंदवून राकेश याला अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस खुनाच्या कारणाचा शोध घेत आहेत. स्थानिकांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे.

husband killed wife Pune Nanded City
Result : ३२ टक्के गुण, पोरगा नापास झाला म्हणून आई-बापाने केला जल्लोष, चक्क...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com