Karnataka Student Fail Party Latest News : मुलाने परीक्षेत चांगले गुण मिळवावेत, अशी प्रत्येक आई-बापाची इच्छा असते. कधी कधी मुलाला गुण कमी पडले म्हणून आई-बाप ओरडतात, हात उगारतात. पण कर्नाटकमध्ये वेगळेच प्रकरण समोर आलेय. मुलगा नापास झाला तरी आई-बापाने केक कापून जल्लोष साजरा करण्यात आलाय. मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आई-बापाने असा निर्णय घेतल्याचे सांगितले जातेय. दोन दिवसाखाली कर्नाटक बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला.
कर्नाटकातील बागलकोट येथे दहावीच्या बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याच्या घरी जल्लोषाचे वातावरण होते. अभिषेक चोलाचगुड्डा याने दहावीच्या परीक्षेत फक्त ३२ टक्के गुण मिळाले होते. तो बसवेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याला बोर्डाच्या परीक्षेत ६०० पैकी फक्त २०० गुण मिळवले. सर्व सहाच्या सहा विषयांत नापास झाल्यामुळे मित्रांनी थट्टा उडवली. पण अभिषेकच्या आई-बापांनी मात्र त्याला समजून घेतलं अन् प्रेरणादायी पाऊल उचलले. मुलाला नापास झाला म्हणून ओरडण्याऐवजी अथवा लाज काढण्याऐवजी केक कापून छोटेखानी उत्सव साजरा केला. आई-बापाच्या या निर्णायामुळे अभिषेकचा आत्मविश्वास वाढलाय.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अभिषेक दहावीच्या परीक्षेत नापास झाला, पालकांनी रागावण्याऐवजी काही बोलण्याऐवजी अपयश साजरे करण्याचा निर्णय घेतला. मुलाला भावनिक आधार मिळावा, मधून त्याने प्रेरित होऊन मेहनत घ्यावी, त्यासाठी अभिषेकच्या वडिलांनी असा निर्णय घेतला. 'परीक्षेत तू नापास झाला असशील, पण आयुष्यात नाही. तू पुन्हा प्रयत्न करू शकतोस आणि पुढच्या वेळी यश मिळवू शकतोस, असे अभिषेकला त्याच्या आई-वडिलांनी सांगितले.
अभिषेक काय म्हणाला ?
नापास झाल्यानंतर आई-वडिलांनी साथ दिली, अपयशातून बाहेर काढण्यास पाऊल उचलले, त्यामुळे अभिषेक खूप प्रभावित झाला. प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिषेक म्हणाला, 'मी नापास झालो तरी माझ्या कुटुंबाने मला प्रोत्साहन दिले. मी पुन्हा परीक्षा देईन आणि पास होईल. पुढे आयुष्यातही मी यशस्वी होईन.' अभिषेकच्या पालकांचा हा दृष्टिकोन कर्नाटकमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.