Beed Crime : बायकोचे बाहेर अनैतिक संबंध, नवऱ्याला कुणकुण, समजावूनही तेच प्रकार; कंटाळून पतीचं धक्कादायक पाऊल...

Beed Ashti Husband Suicide : मंगळवारी ६ मे रोजी सकाळी गणेश शेंडगे हा घरी असताना पत्नीच्या मोबाईलवर पुन्हा अक्षय पडोळेचा फोन आला. यामधून त्यांचा वाद झाला आणि गणेश शेंडगेने घरातच गळफास लावून आत्महत्या केली.
Wife Immoral Relationship Husband Suicide
Wife Immoral Relationship Husband SuicideSaam Tv News
Published On

बीड : बीडमधील आष्टी तालुक्यातील कासारी येथील गणेश शेंडगे आणि ऋतुजा यांचा गेल्या काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ऋतुजा आणि अक्षय पडोळे नामक तरुणाचे विवाहबाह्य संबंध होते. याची माहिती काही दिवसांनी गणेश शेंडगे याला लागली. मात्र स्वतःच्या मुलाचा विचार करून त्याने आणि नातेवाईकांनी ऋतुजासह अक्षय पडोळेला समजावून सांगितलं. मात्र, तरीही अक्षय पडोळे आणि ऋतुजाने संबंध कायम ठेवले.

मंगळवारी ६ मे रोजी सकाळी गणेश शेंडगे हा घरी असताना पत्नीच्या मोबाईलवर पुन्हा अक्षय पडोळेचा फोन आला. यामधून त्यांचा वाद झाला आणि गणेश शेंडगेने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. ही संपूर्ण घटना ऋतूजा हिने कोणालाही सांगितली नसल्याचा आरोप गणेश शेंडगे यांचे भाऊ दशरथ शेंडगे यांनी फिर्यादीमध्ये केला आहे.

Wife Immoral Relationship Husband Suicide
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर सुरूच; पाकिस्तानमधील आणखी १२ ठिकाणं टार्गेटवर

दरम्यान, बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडमधील पिंपरी घाट गावात गावजेवणाच्या कार्यक्रमानंतर तब्बल ५० जणांना विषबाधा झाली. रात्री गावात जेवणाचा कार्यक्रम झाला. पहाटेपासून गावातील अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी यांसारखा त्रास व्हायला सुरुवात झाली. पीडितांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

५० ग्रामस्थांना पोटदुखी, उलट्यांसारखी लक्षणे जाणवू लागल्याने गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडीने गावच्या सरपंचांना यासंबंधित माहिती दिली. सरपंचांनी इतर गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सर्व रुग्णांवर सध्या अपघात विभागात उपचार सुरु आहेत.

Wife Immoral Relationship Husband Suicide
Beed News : उलट्या, जुलाब, पोटदुखी; गावजेवणातून ५० जणांना विषबाधा, बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात घडला प्रकार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com