Kasara Police Station Saam Tv
क्राईम

Shahpur Crime News: क्रूर बापानं गाठला कळस! पत्नीसोबत भांडण झाल्याने 8 वर्षीय मुलाची केली निर्दयपणे हत्या

Kasara Police Station: शहापूरमध्ये एका क्रूर बापाने पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर आपल्या मुलाची निर्दयपणे हत्या केल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

फैयाज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

शहापूरमध्ये अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथे एका क्रूर बापानेच आपल्याच आठ वर्षीय मुलाची निर्दयपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग या नराधमाने आपल्या मुलावर काढला. या क्रूर बापाने आपल्या 8 वर्षाच्या मुलाला तोंडात बोळा कोंबून त्याची हत्या केली आहे.

ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी बापाला अटक केली आहे. एकनाथ नामदेव गायकवाड (59) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक हिंसाचाराची ही घटना शहापूर तालुक्यातील वाशाळा खुर्द गावात घडलीय आहे. कोणत्या तरी कारणावरून एकनाथ गायकवाड याचं त्याच्या पत्नीसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडणानंतर एकनाथ हा खूप संतापलेला होता.

हाच संताप त्याने आपल्या आठ वर्षीय मुलावर काढला. पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर संतापलेल्या एकनाथने आपल्या मुलाच्या तोंडात कागदाचा बोळा कोंबून त्यांची हत्या केली.

दरम्यान, याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या काही तासानंतरच आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली. एकनाथ नामदेव गायकवाड याने आपल्या मुलाची हत्या का केली? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये मतदार यादीत मोठा घोळ, भाजप नेत्याचं नावच गायब|VIDEO

Crime: लग्नाला नकार दिला, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडला संपवलं; प्रेमाचा भंयकर शेवट

विद्येच्या माहेरघरात जादूटोणा, शाळेत गोलाकार चिन्हात लिंबू, अंडी अन् कुंकू; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्याला कारने उडवलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

Pune News: राज्यातील डाळिंबाच्या बागा टार्गेट? पुण्यातील शेतातून तब्बल ४.५ हजार किलो डाळिंब चोरीला, सोलापुरातही तशीच घटना

SCROLL FOR NEXT