Jalna Crime  Saam Tv
क्राईम

Crime: लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, वंचित बहुजन आघाडीच्या बड्या नेत्याला अटक

Sangli Police: सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बड्या नेत्याला पोलिसांनी अटक केली. लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर वारंवार बलात्कार करत तिला मारहाण केली. या प्रकरणामुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली.

Priya More

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगलीतील वंचित बहुजन आघाडीच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपीने महिलेला मारहाण देखील केली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर मानेवर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर मानेला कवठेमहांकाळ पोलिसांनी पहाटे राहत्या घरातून अटक केली. लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप शंकर मानेवर आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरोधात पोलिसांनी कारवाई केली.

पीडित महिलेस शंकर माने, त्याचा भाऊ, आणि पत्नी यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप देखील आहे. भारतीय न्याय सहिंता २०२३ चे कलम ६४, ६९ नुसार शंकर मानेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली आणि कवठे महांकाळ तालुक्यातील झुरेवाडी येथे वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरोपी शंकर मानेने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिला गरोदर केले. या पीडितेल मुल देखील झाले. यासोबतच फिर्यादीने मुलाच्या कागदपत्रांसाठी कवठेमहांकाळ येथील कार्यालयात अर्ज केल्यावर आरोपी शंकर माने यांच्यासह शोभा माने, सिद्धू माने आणि सविता माने या चौघांनी मिळून पीडित महिलेला मारहाण केली. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT