Rohingya in Pune 
क्राईम

Rohingya in Pune: रोहिंग्यानं पुण्यात थाटला संसार, बांगलादेशमधून पश्चिम बंगालमार्गे भारतात एन्ट्री; काय आहे प्रकरण?

Rohingya in Pune: म्यानमधील एका रोहिंग्याने चक्क पुण्यात स्वतःचे घर बांधल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ५०० रुपये देऊन बनावट आदार कार्ड बनवून भारतीय असल्याची ओळख पटवून दिली.

Dhanshri Shintre

म्यानमार येथून बांगलादेशात स्थलांतर केल्यानंतर रोहिंग्या आरोपी मुजम्मिल खान याने सहकुटुंब बेकायदेशीरपणे पश्चिम बंगाल मार्गे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला आणि थेट पुण्यात आला. कोणतेही कागदपत्र नसताना मुंबईतील भिवंडी येथील एजंटला फक्त 500 रुपये देऊन बेकायदेशीरपणे केले आधार कार्ड तयार केला. हे आधार कार्ड दाखवून भारतीय नागरिक म्हणून वावरू लागला.

सुपारी विक्रीचे काम करताना देहूरोड येथे रोख ८० हजार रुपये देऊन जागा घेतली. खरेदीखताची नोंद न करता स्वतःचे घर बांधले. तसेच भारतीय पासपोर्ट ही मिळविले. जुलै महिन्यात चार रोहिंग्या हे म्यानमारमधून बांगलादेशात आणि बांगलादेशातून थेट मावळमधील देहूरोड परिसरातील गांधीनगर भागात पंडित चाळीत बेकायदेशीर पद्धतीने राहत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी या चौघांवर कारवाई केली होती.

मात्र, याच्यातल्या एका मुजल्लीम खान यांने देहूरोडला ८० हजार रुपयांना जागा विकत घेतली. त्या जागेवर घर बांधलं आणि संसार देखील थाटला. बनावट कागदपत्र वापरून ही जागा बेकायदेशीर पद्धतीने विकत घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. मुजम्मिल खान याने चंद्रभागा कांबळे यांच्याकडून ८० हजार रुपयांना ६०० चौरस फूट जागा खरेदी केली होती. मुजम्मिल खान याने म्यानमार येथील इस्लामिक संस्थेत मौलाना कोर्स देखील पूर्ण केला आहे. तो आणि त्याची पत्नी आणि दोन मुलांसह म्यानमार येथे राहत होता. त्याच्यानंतर २०२२ मध्ये कुटुंबासह बांगलादेशात राहायला गेला.

मात्र, बांगलादेशात काहीही काम मिळू शकत नसल्याने तो भारतात आला. कोलकत्तामध्ये राहत असताना तिथे काम न मिळाल्याने त्याने थेट पुण्यात रेल्वेने धाव घेतली आणि देहूरोडला बेकायदेशीर पद्धतीनं राहत होता. सुरवातीला देहूरोड परिसरात कपडे विकण्याचा व्यवसाय करत होता. भिवंडीतून कपडे आणून मावळातील देहूरोड परिसरात विकायचा. भिवंडीत असताना ५०० रुपये देऊन त्याने आधार कार्ड तयार केलं आणि त्यातून त्यांने भारतीय असल्याची ओळख सगळ्यांना पटवून दिली. त्यानंतर या खानने देहूरोड भागात सुपारी विकायला सुरुवात केली आणि याच काळात देहूरोड येथील गांधीनगर भागातील चंद्रभागा कांबळे यांच्या संपर्कात येऊन त्यांच्याकडून ८० हजार रुपयाने ६०० चौरस फूट जागा विकत घेतली आणि तिथेच घर बांधलं.

खान आता जामीनावर बाहेर आहे. मात्र यापूर्वी २००८ साली संरक्षण खात्यातील देहूरोड सीओडी डेपोचे कमांडर ब्रिगेडियर राठोड यांनी देहूरोडच्या शीतळानगर भागात स्टिंग ऑपरेशन केलं होतं, त्यावेळी काही संशयास्पद बांगलादेशी यांचे कपडे तसेच चीजवस्तू सापडल्या होत्या. तेव्हापासून देहूरोड परिसरात आर्मी आणि पोलीस अलर्ट मोडवर आले होते. कारण की देहूरोड परिसरात भारत सरकारच्या संरक्षण खात्यातील अनेक महत्वाचे डेपो आहेत. मात्र यातून आजूबाजूच्या देशातील लोक बेकायदेशीरपणे आणि बनावट कागदपत्र तयार करून भारतात कसे घुसखोरी करत आहेत? हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

SCROLL FOR NEXT