Birds Migaration: परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे अकोला जिल्ह्यातील जलाशयांवर आगमन

Birds Migaration: भारताच्या उत्तरेकडील देशांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाल्यानंतर पक्षी दरवर्षी भारतात येतात.
Birds Migaration
Birds Migaration
Published On

पक्षी प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. उत्तरेकडील अति थंड परदेशामधून भारतात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे अकोला जिल्ह्यातील जलाशयांवर आगमन सुरु झाले आहे. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पक्षाचे थवेच्या थवे दिसून येत आहेत. भारताच्या उत्तरेकडील देशांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाल्यानंतर पक्षी दरवर्षी भारतात येतात.

हजारो किलोमीटरचा प्रवास करत हे परदेशी पक्षी दक्षिण भारताकडे जाताना अकोला जिल्ह्यात काही काळ मुक्काम करतात. यातीलच काही पक्षी अकोल्यातल्या कापशी तलाव, कुंभारी तलाव, आखतवाडा तलाव, काटेपूर्णा जलाशय, पोपटखेड तलावसह जलाशयांवर दिसतायेत. तर काहींचा 2 ते 3 महिन्यांचा दीर्घ मुक्काम असतोय, तर काही पक्षी एक ते दोन दिवस थांबून पुढच्या प्रवासाला निघतायेत.

Birds Migaration
Kurla Accident: क्लच समजून चुकून 'एक्सिलेटर' दाबला, अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं? आरोपी चालकानं सर्वकाही सांगितलं...

कोणकोणते पक्षी आले?

चक्रयाक, तुतवार, कॉटन पिग्मी, नॉर्दन शींचलर, रेड फिस्टर्ड पोचाई, ब्राह्मणी धार, पद्रकदंब, ग्रे गेनी, चक्रांक बदक, मुनिया, गडवाल, शंकर, कॉमन पोचाई, छोटा आलर्जीसह अन्य परदेशी पक्ष्यांचे आगमन झाल्याचे दिसून आलेत.

विशेषतः युरोपीयन देश तसेच मंगोलिया, सायबेरिया परिसरातून विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यात दाखल होतात. जिल्ह्यातील तलाव व पक्ष्यांचे आवडते खाद्य येथे उपलब्ध असल्याने मोठ्या संख्येने विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. युरोपीयन देशात वाढत्या थंडीमुळे येथे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. अनुकूल वातावरण आणि हवे असलेल्या अन्नाची उपलब्धता लक्षात घेऊन हे पक्षी प्रवास करीत असतात. स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापून नोव्हेंबरपासून ते डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत या पक्ष्यांचा मुक्काम असतो.

Birds Migaration
Ladki Bahin Yojana: धुळ्यातील २१२४९ महिलांना पैसे आलेच नाहीत, ५ लाख लाडक्या बहि‍णींना मिळाला लाभ!

विदेशी पक्ष्यांसाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा कालावधी अनुकूल असतो. युरोपीयन देश तसेच मंगोलिया, सायबेरिया या देशात या कालावधीत थंडी अधिक असते, तर त्या तुलनेत या आपल्या भागात थंडी कमी असते. सध्या विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झा आहे.

Birds Migaration
Viral Video: दिलजीत दोसांझच्या बंगलोर कॉन्सर्टनंतर दीपिका पादुकोण पहिल्यांदा दिसली लेकीसोबत, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com