Rajsthan Crime Saam Tv
क्राईम

Crime News: नेटवर शोधलं 'गळा कसा दाबायचा', मित्राच्या आजीची हत्या करत लुटलं घर, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचा प्रताप

Engeeniring Student Killed Grandmother: राजस्थानमधील उदयपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंजिनीअरींगच्या एका विद्यार्थ्याने मित्राच्या आजीचा गळा आवळून खून केलाय. त्यानंतर मित्राचं घर लुटलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rajsthan Crime News

राजस्थानच्या (Rajsthan) उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने कर्जबाजारी झाल्यामुळं मित्राचे घर लुटण्याचा कट रचला. त्याने मित्राला त्याच्या घराची प्रत्येक छोटी-मोठी माहिती विचारली. मित्राचे कुटुंबीय बाहेर गेले असता संधीचा फायदा घेत तो घरात घुसला. त्याने मित्राच्या आजीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. (Latest Crime News)

आजीची मुलगी घटनास्थळी येताच आरोपी विद्यार्थ्याने तेथून (Crime News) पळ काढला. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्याने गुन्हा करण्यापूर्वी त्याच्या मोबाईलवर गळा कसा दाबायचा, अशी माहिती शोधल्याचे समोर आलं आहे. उदयपूरच्या भूपालपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सुखदेव नगर येथून पोलिसांनी १९ वर्षीय वर्णिक सिंग याला अटक केली आहे. चौकशीत आरोपी वर्णिक हा मृत आजीचा नातू आयुषचा मित्र असल्याचे समोर आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मित्राचं घर लुटण्याची योजना

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी वर्णिक सिंग हा उदयपूरमधील एका कॉलेजमधून इंजिनीअरिंग (Engeeniring Student) करत आहे. त्याला ऑनलाइन बेटिंग खेळण्याची खूप आवड आहे. बेटिंगमध्ये पैसे गमावल्यानंतर त्याच्यावर बरंच कर्ज झालंय. ते कर्ज फेडण्यासाठी त्याने मित्राचं घर लुटण्याची योजना आखली, पण ती अयशस्वी झाली. आरोपीचे वडील सैन्यात काम करतात, असं सांगितलं जात आहे.

आरोपी आणि त्याचा मित्र आयुष दोघंही चौथीपासून एकमेकांना ओळखतात. आरोपीने बारावीनंतर इंजिनीअरिंगला प्रवेश (Rajsthan) घेतला. इंजिनीअरिंग करत असताना त्याने आपल्या मित्राकडून त्याच्या घराची सर्व माहिती घेतली. आयुषचे वडील हॉटेल ऑपरेटर तसेच रिअल इस्टेटचा व्यवसाय करत असल्याचं समोर आलंय.

संधीचा घेतला फायदा

घटनेपूर्वी आरोपीने त्याच्या मित्राशी बोलून घराची बरीच माहिती गोळा केली. तेव्हा त्याला समजलं की, त्याचा मित्र व कुटुंबीय नाशिकला जात (Killed Grandmother) आहे. त्याची आजी मीरा देवी घरी एकटीच असणार आहे. 27 जानेवारी रोजी आरोपी मित्र आयुषच्या घरी गेला. तेव्हा त्याने तोंडावर मास्क आणि डोक्यावर हेल्मेट घातलेलं होतं. आरोपी मित्राच्या घरी पोहोचला. त्याने वृद्ध आजीवर हल्ला केला. गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला.

आजीने आरडाओरडा केल्यावर तिची मुलगी सीमा धावत जवळच्या खोलीत आली. तेव्हा आरोपीने तिला धमकावून तेथून पळ काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

SCROLL FOR NEXT