Crime News update AI Photo
क्राईम

Crime News : प्रेमात गुलिगत धोका, गोड गोड बोलण्याला भाळली, ६ महिन्यात तरूणीला 23.50 लाख रूपयांना गंडवलं

Fraud on Social Media : सोशल मीडियावर ओळख, प्रेमात रूपांतर आणि मग धोका... होय एकाद्या चित्रपटाप्रमाणेच दिल्लीमध्ये घटना घडली आहे. राजस्थानच्या मुलीला दिल्लीच्या मुलाने गंडवलेय.

Namdeo Kumbhar

Crime News update : प्रेम खरंच आंधळं असतं. जोपर्यंत डोळ्यावर प्रेमाची पट्टी असते, तोपर्यंतच प्रेम आंधळं असतं. ते एवढं आंधळं होत की जोडीजाराच्या काही वाईट गोष्टी दिसत नाहीत. पण एकदा का विश्वास उडाला की माणूस जमिनीवर येतो. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेले असते. असाच एक प्रकार समोर आलाय. राजस्थानची मुलगी दिल्लीमधील तरूणाच्या प्रेमात पडली. त्याच्या बोलण्यात ती इतकी गुंतली की प्रेमासाठी काहीही करायला तयार झाली. सहा महिन्याच्या प्रेमात त्या मुलीने २३.५० लाख रूपये त्याला दिले.

सोशल मीडियावर फ्रेंडशिप रिक्वेस्टच्या एका क्लिकपासून सुरू झालेलं नातं २३.५० लाख रूपयांच्या फसवणुकीपर्यंत जाऊन पोहचले. दिल्लीमधील विवेकानंद रॉय यानं राजस्थानमधील झालावाडा येथील मुलीला फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली. तेथून दोघांमध्ये मैत्री अन् मग प्रेमाचा प्रवास सुरू झाला. त्याच्या गोड गोड बोलण्याला ती भाळली, अन् बँक खातं रिकामं केलं. दिल्लीच्या विवेकानंद रॉय यानं प्रेमाच्या नावावर लाखो रूपये लुबाडले.

प्रेमाच्या नावावर फसवलं -

झालावाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ यादरम्यान सहा महिन्यात मुलीला २३.५० लाख रूपयांना लुबाडले. त्याचं प्रेमळ गोड गोड बोलणं, आणि लग्नाचं खोटं वचन... त्यानंतर आजारपणाचं कारण सांगत पैसे लुबाडत राहिला. मुलीला त्याच्यावर थोडाही संशय आला नाही, ती त्याच्या जाळ्यात अडकत राहिली.

पैसे मागितले, मैत्री तोडली -

वारंवार त्याच त्या गोष्टी होत असल्यामुळे मुलीला त्याच्यावर संशय आला. मुलीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर विवेकानंद रॉयने तिला सोशल मिडिया आणि फोनवर ब्लॉक केले. प्रेमाच्या नावाने आपल्याला गुलिकत धोका दिल्याचे लक्षात येताच तरूणीने पोलीस स्टेशन गाठलं.

पोलिसांनी काय केली कारवाई -

झालावाड पोलिस अधीक्षक ऋचा तोमर यांनी हे प्रकरण ‘सायबर शिल्ड’ अभियानाअंतर्गत घेतल्याचं सांगितलं. पोलिसांनी याप्रकरणाचा वेगानं तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी विवेकानंद याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने आणखी कुणाला फसवलेय का? याचा तपास करण्यात येत आहे. विवेकानंद यानं ऑनलाइन बेटिंगमध्ये पैसे गमावल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Christmas Plum Cake : ख्रिसमससाठी बनवा ड्रायफ्रुट्सने भरलेला प्लम केक, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

SCROLL FOR NEXT