Pune : 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार, डॉक्टर तरुणीनं क्लिनिकमध्येच आयुष्य संपवलं, पुण्यातील घटना

Pune Bibwewadi Crime News : 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्याने डॉक्टर तरुणीनं टोकाचं पाऊल उचलले, विष प्राषण करून आत्महत्या केली.
Police FIR
Police FIRSaam tv
Published On

Pune Crime News : पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. मानसिक धक्क्यातून महिला डॉक्टरकडून क्लिनिकमध्ये विषारी औषध घेत आत्महत्या केली. पल्लवी पोपट फडतरे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. कुलदिप आदिनाथ सावंत असं डॉक्टर महिलेची फसवणूक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कुलदीप सावंत विरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Police FIR
Pune Accident : भोरमध्ये भीषण अपघात, २ दुचाकी समोरासमोर धडकल्या, २ जणांचा जागीच मृत्यू

संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे सांगून लग्नाचे आश्वासन देत फसवणूक केल्याने पल्लवी पोपट फडतरे (वय २५) यांनी आयुष्य संपवले. तिच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३०, रा. शंकर कॉलनी, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police FIR
Maharashtra Weather Update : रात्री गारठा, दिवसा उकाडा! पुढील ५ दिवसा तापमानाचा अंदाज काय?

कुलदीपने लग्नाचे आमिष दाखवून पल्लवीकडून १० लाख रुपये घेतले होते, नंतर त्याने आपली पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. या धक्क्यातून पल्लवीने आत्महत्येचे पाऊल उचलले. पोलिसांनी याप्रकरणी कुलदीप विरोधात गुन्हा दाखल केलाय. कुलदीप याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवासंपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

Police FIR
Solapur-Pune Highway: सोलापूर-पुणे महामार्ग आता सहापदरी होणार, ३ उड्डाणपूल; सोलापूर-पुणे-सोलापूर प्रवास करा सुसाट!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com