pune rural police arrests 4 in lonavala Saam Digital
क्राईम

लाेणावळा, कामशेतमध्ये पाेलिसांचा छापा; अंमली पदार्थांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त; चाैघांना अटक

pune rural police arrests 4 in lonavala: दरम्यान या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अमली पदार्थ विकणाऱ्यांचं मोठं रॅकेट बाहेर येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी वर्तविली आहे.

दिलीप कांबळे

मावळ येथे लोणावळा पोलिसांनी दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये साडेतीन लाखांच्या अमली पदार्थासह एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाेलिसांनी या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा आणि कामशेत मध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची चोरून विक्री होत आहे. त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती लोणावळ्याचे पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. युवकांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी पोलिस अधीक्षक कार्तिक विविध उपक्रम राबवित आहेत.

कामशेत परिसरात ज्या ठिकाणी अमली पदार्थ विकले जातात त्या ठिकाणी दाेन पाेलिसांची पथके पाठविली. या दाेन्ही पथकाने मोठ्या शिताफीने लोणावळा आणि कामशेत या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत 12 लाख 14 हजार 146 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाेलिसांनी दिनेश दीपक शिंदे, सौरभ राजेश शिनगारे, शिवाजी मारुती कडू आणि दिलीप बबन पिंगळे या चार संशयितांवर गुन्हा दाखल केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT