Crime News Saam Tv
क्राईम

Pune Crime News: पुण्यात उच्चशिक्षित मोबाईल चोरटा गजाआड, चोरलेले मोबाईल विकण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले

Highly Educated Thief Arrested: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतेय. त्याचप्रमाणात गुन्हेगारांमध्ये उच्चशिक्षीत तरूणांचं प्रमाण देखील वाढत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Thief Arrested 17 Mobile Seized

दिवसेंदिवस पुण्यात चोरीच्या घटनांचं प्रमाण वाढत आहे. अलीकडे उच्चशिक्षीत तरूणांमुळे आता चोरीच्या घटना देखील सफाईने होत आहेत. पुण्यात असाच एक उच्चशिक्षीत चोरटा गजाआड केलाय. पोलिसांनी त्याच्याकडून १७ मोबाईल देखील जप्त केले आहेत.  (latest crime news in marathi)

चोरीचे १७ मोबाईल जप्त

मोबाईल (Mobile) चोरी करून बनावट बिलाच्या आधारे त्याची विक्री करणाऱ्या उच्चशिक्षित चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. तो बीएस्सी पदवीधर आहे. त्याच्या ताब्यातून चोरीचे १७ मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी (Pune Crime News) दिलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

ओंकार विनोद बत्तुल (वय २२, रा. नाना पेठ) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. शिवाजीनगर येथील जुना तोफखाना भागातील फर्निचरच्या दुकानातून आरोपीने मोबाईल चोरी (Mobile) केला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाइलच्या बिलामध्ये फेरफार

आरोपीला शिवाजीनगर भागातून अटक केली. चौकशीनंतर त्याच्या ताब्यातून १७ मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपी चोरलेल्या मोबाइलच्या बिलामध्ये फेरफार करून स्वत:चा मोबाईल असल्याचं भासवून विक्री करीत (Pune Crime) होता. बनावट बिलाच्या आधारे मोबाईल विक्री केल्याचं तपासात समोर आलंय.

मोबाईल मालकांचा शोध सुरू

जप्त करण्यात आलेल्या मोबाईल (Mobile) मालकांचा शोध सुरू करण्यात आलाय. जे व्यापारी मोबाईल खरेदी-विक्री करतात, त्यांनी जुने वापरलेले मोबाईल खरेदी-विक्री करताना त्या मोबाईलच्या बिलाची पडताळणी (Pune Crime News) करावी. त्यानंतरच कोणतेही व्यवहार करावेत, असं आवाहन पोलिसांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकरासाठी हे उपाय नक्की करा; मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Fast: उपवासात लिंबू पाणी चालतं का? जाणून घ्या सत्य

Nagpur: बिअर बारमध्ये 'महाराष्ट्र शासन'ची फाईल, नागपुरमधील 'त्या' VIDEO मुळे उडाली खळबळ

Nag Panchami Fast: नाग पंचमीला स्त्रिया भावासाठी उपवास का करतात?

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट रद्द

SCROLL FOR NEXT