अभिजीत देशमुख
Kalyan Naws : डोंबिवली मानपाडा पोलिसांनी दोन सराईत चोरट्याना बेड्या ठोकल्या आहेत. युसूफ शेख, नौशाद आलम अशी या दोन्ही सराईत चोरट्याची नावे आहेत. या दोघांविरोधात ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील एकूण १८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील एका डान्स बारमधील एका बारबालेवर यूसूफचा जीव जडला होता. आत्तापर्यंत त्याने तिच्यावर ५० लाख रुपयांची उधळण केली.
केवळ तिच्यावर पैसे उधळण्यासाठी यूसूफ त्याचा मित्र नौशादसोबत चोऱ्या करत होता. हे दोघे सराईत गुन्हेगार असून युसूफला याआधी २३ गुन्ह्यात तर नौशादला ११ गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या दोघांची जेलमध्ये मैत्री झाली होती. पोलिसांनी या दोघांकडून २० तोळे सोन्याचे दागिने, सव्वा दोन लाखांची रोकड, दोन बाईक, २ लॅपटॉप, ८ मोबाईल, पाच महागडी घड्याळ, १ महागडा कॅमेरा, स्क्रू ड्रायव्हर, चाकू, पक्कड हस्तगत केली आहे. (Maharashtra News)
कल्याण डोंबिवली परिसरात घरफोडीचे प्रकार वाढले होते. या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके नेमली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोरी, लूट, स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला होता. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक मदने, पोलिस अधिकारी सनिल तारमळे, अविनाश वनवे आणि प्रशांत आंधळे या तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरु केला. (Crime News)
अखेर पोलिसांना यश आले. पोलिसांनी नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहणारा यूसूफ शेख आणि त्याचा मित्र नौशादला अटक केली. या दोघांकडून १८ गुन्ह्याची उकल झाली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दागिने, पैसे, लॅपटॉप मोबाईल इतर साहित्य जप्त केले आहे. यूसूफ याला २३ चोरी प्रकरणात या आधी अटक करण्यात आली होती. नौशादलाही ११ चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. (Latest Marathi News)
आरोपी चोरी कशासाठी करायचे हे ऐकून पोलिसही थक्क झाले. मुंबईतील एका डान्सबारमध्ये काम करणाऱ्या बारबालेवर युसूफचा जीव जडला. तिला खूष करण्यासाठी यूसूफने आत्तापर्यंत ५० लाख उधळले आहेत. नौशाद त्याच्यासोबत जायचा आणि बसायचा. हे दोघेही चोरी केलेले पैसे तिच्यावर उधळायचे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.