Chandrayaan-3
Chandrayaan-3Saam TV

Chandrayaan-3 Update News : चांद्रयान-3 कुठपर्यंत पोहोचलं? चंद्रापासून १४३७ किमी दूर

ISRO News : 5 ऑगस्ट 2023 रोजी, जेव्हा चांद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले. त्यानंतर त्याने चंद्राचे फोटो प्रसिद्ध केले होते.
Published on

Chandrayaan-3 Update :  चांद्रयान-3 चंद्रावर कधी पोहोचणार याची प्रतीक्षा सर्व भारतीयांना आहे. येत्या काही दिवसात चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. सध्या इस्रोने चांद्रयान-3 चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत आणले आहे. आता चांद्रयान १७४ किमी x १४३७ किमीच्या लहान लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी, जेव्हा चांद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले. त्यानंतर त्याने चंद्राचे फोटो प्रसिद्ध केले होते.

त्यावेळी चांद्रयान-3 चंद्राभोवती 164 x 18074 KM च्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद या वेगाने फिरत होते. जे 6 ऑगस्ट 2023 रोजी 170 x 4313 किमी कक्षेत म्हणजे चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले.  (Latest Marathi News)

Chandrayaan-3
Chandrayaan-3 News: गुड न्यूज! चांद्रयान-3 ने टिपला चंद्राचा पहिला फोटो, इस्रोने जारी केला व्हिडीओ...

चांद्रयान-३चा किती प्रवास बाकी?

आता 14 ऑगस्ट रोजी चंद्रयान चौथ्या कक्षेत प्रवेश करणार आहे. 16 ऑगस्टला सकाळी 8.38 ते 8.39 दरम्यान पाचव्या कक्षेत प्रवेश करेल. 17 ऑगस्टला चांद्रयान-3 चे प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. त्याच दिवशी, दोन्ही मॉड्यूल चंद्राभोवती 100 किमी x 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत असतील.

Chandrayaan-3
Chandrayaan 3 Update: 'चांद्रयान-३'चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, इस्रोने ट्वीट करून दिली माहिती

18 ऑगस्ट रोजी लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग दुपारी 4.45 ते 4 दरम्यान होईल. म्हणजेच त्याच्या कक्षेची उंची कमी होईल. 20 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल रात्री 1.45 वाजता डि-ऑर्बिटिंग करेल. 23 ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. जर सर्व काही ठीक झाले तर लँडर 6.30 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com