Bomb Threat to Airline Saam Digital
क्राईम

Crime News : पुण्यात चाललंय तरी काय? सलग दुसऱ्या दिवशी २० विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune Bomb Blast Threat : काल ११ विमानांना धमकी दिली होती. त्यात आज पुन्हा २० विमानांमध्ये ब्लास्ट करणार अशी धमकी देण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील इंडिगो एअरलाइनची २० विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. काल देखील अशीच धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी देखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमक्यांमुळे प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ई-मेलवरून अज्ञाताने ही धमकी दिली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पुणे एअरपोर्टवरील विमानांना उडून देण्याची धमकी आली आहे. काल ११ विमानांना धमकी दिली होती. त्यात आज पुन्हा २० विमानांमध्ये ब्लास्ट करणार अशी धमकी देण्यात आली आहे.

इंडिगो कंपनीसह इतर कंपन्यांना धमकी मिळत असल्याने हवाई वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांचं ६०० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. प्रवासी विमानांना धमकी येण्याचे सत्र थांबत नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण वाढतच आहे. विमाने उडून देण्याची धमकी देणाऱ्या अज्ञाता विरोधात विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोर्टाच्या आवारात फुटला ग्रेनेड बॉम्ब

काल जम्मू-काश्मीरच्या बारामूला या भागात देखील एक धक्कादायक घटना घडली. बारामूला येथे एका ग्रेनेड बॉम्बचा स्फोट झाला. हा स्फोट मलखाना कोर्ट परिसरात झाला होता. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ग्रेनेड बॉम्ब चुकून फुटल्याचं बोललं जात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni Full Name: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं पूर्ण नाव काय आहे? अनेकांना माहित नाही

Ajinkyatara Fort : 'अजिंक्यतारा किल्ला' साताऱ्यातील ऐतिहासिक ठिकाण, लहान मुलांसोबत एकदा भेट द्याच

Shirdi : शिर्डीत साईचरणी गुरुपौर्णिमा उत्साहात; 6 कोटी 31 लाखांचं दान | VIDEO

MHADA Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे आवश्यक? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

SCROLL FOR NEXT