

बिहारमधील राज्यसभा निवडणुकांमुळे राजकारण तापलं
पाच जागांसाठी राजकीय डावपेच सुरू
एनडीए चार जागांवर मजबूत स्थितीत
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी चालू असताना बिहारमधील राजकारण तापलंय. एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागेसाठी राजकीय डावपेच आखले जात आहेत. या पाच जागांपैकी चार जागांवर सध्या एनडीए आणि एक महाआघाडीकडे आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांमधील बलाबलानुसार एनडीए चार जागांवर विजय मिळवू शकते. तर पाचव्या जागेसाठी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. पाचव्या जागेमुळे राज्यसभा निवडणूक अधिक अटातटीची बनवली आहे.
एप्रिल २०२६ मध्ये बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागा रिक्त होत आहेत. यामध्ये जेडीयूकडून हरिवंश नारायण सिंह आणि रामनाथ ठाकूर, आरजेडीकडून प्रेमचंद गुप्ता आणि अमरेंद्र धारी सिंह आणि आरएलएममधून उपेंद्र कुशवाह यांचा समावेश आहे. बिहार विधानसभेत एकूण २४३ सदस्य आहेत. सध्या एनडीएकडे २०२ आमदार आहेत.
भाजप ८९, जेडीयू ८५, एलजेपी रामविलास १९, एचएएम ५ आणि राष्ट्रीय लोक मोर्चा ४. तर महाआघाडीकडे ३५ आमदार आहेत. यात आरजेडी २५, काँग्रेसच्या ६ तर अन्य ४ आमदार आहेत. यातील ६ आमदार कोणत्याच आघाडीत नाहीत. दरम्यान राज्यसभेच्या जागांवर या पक्षांची करडी नजर असणार आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या गणितानुसार प्रत्येक जागा जिंकण्यासाठी ४१ मते आवश्यक असतात. हा आकडा खालीलप्रमाणे काढला जात असतो. विधानसभेच्या एकूण जागांची संख्या राज्यसभेच्या जागांच्या संख्येला एका अधिक संख्येनं भागलं जातं. म्हणजेच 243/5+1 = (40.5) 41 यानुसार २०२ आमदारांसह एनडीए सहजपणे चार जागा जिंकू शकते. त्यामुळे त्यांच्याकडे ३८ अतिरिक्त मते शिल्लक राहतात. म्हणजेच काय तर पाचव्या जागेसाठी विरोधी पक्षातील तीन आमदारांचा किंवा इतरांचा पाठिंबा आवश्यक असणार आहे. दुसरीकडे, जर विरोधी पक्षाकडे सर्व मते एकत्रित राहिली तर ३५+६=४१, यानुसार ते पाचवी जागा जिंकू शकतात.
यात AIMIMचे सर्व पाच आमदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतलीय. त्यांनी पाठिंबा देण्याचं ठरवलंय. दरम्यान यात बसपाचा एकटा आमदार काय करणार हे अजून निश्चित नाही. दुसरीकडे लोजपा रामविलास यांच्या कोट्यातून नितीश सरकारमधील मंत्री संजय सिंह यांनी असा दावा केला की, मकर संक्रांतीनंतर काँग्रेसमध्ये फूट पडेल आणि सर्व सहा आमदार एनडीएमध्ये सामील होतील. जर असं झालं तर राज्यसभेत एनडीएच्या पाच जागा असतील. तर काँग्रेसचे नेते शकील अहमद म्हणाले की, काँग्रेस आरजेडीशी वेगळं होत आपला मार्ग वेगळा करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.