Shruti Vilas Kadam
उभ्या रेषांचे (Vertical Stripes) कपडे शरीराला लांबट लूक देतात. त्यामुळे उंची अधिक भासते आणि शरीर सडपातळ दिसते.
हाय-वेस्ट जीन्स, पॅन्ट किंवा स्कर्टमुळे पाय लांब दिसतात. यामुळे एकूण उंचीचा भास वाढतो.
एकाच रंगातील टॉप आणि बॉटम परिधान केल्यास शरीरावर तुटकपणा दिसत नाही आणि उंच दिसण्यास मदत होते.
लहान लांबीचे (क्रॉप) किंवा फिटेड टॉप्स घातल्यास कंबर वर दिसते आणि पाय जास्त लांब वाटतात.
फ्लोई, स्लीक आणि स्लीट असलेले मॅक्सी ड्रेस उंची वाढवून दाखवतात. फार जड किंवा खूप घेर असलेले ड्रेस टाळा.
पायांच्या रंगाशी जुळणाऱ्या (Nude) हील्स किंवा पॉइंटेड टो फुटवेअरमुळे पाय लांब दिसतात आणि उंचीचा भास वाढतो.
खूप सैल किंवा ओव्हरसाइज कपडे घातल्यास उंची आणखी कमी दिसू शकते. फिटिंगचे कपडे तुमच्यासाठी अधिक योग्य ठरतात.