

KTM RC 160 भारतीय बाजारात अधिकृत लॉन्च
118 kmph टॉप स्पीडसह दमदार परफॉर्मन्स
स्पोर्टी लूक आणि प्रीमियम फीचर्स आकर्षण
केटीएम इंडियाने त्यांची नवीन स्पोर्ट्स बाईक KTM RC 160 भारतीय बाजारात लाँन्च केली आहे. ही बाईक सुपरस्पोर्ट सेगमेंटमध्ये केटीएमची सर्वात परवडणारी बाईक बनलीय. ही बाईक 125 ची जागा घेईल. शक्तिशाली इंजिन, स्पोर्टी लूक आणि प्रभावी फीचरसह लॉन्च झालेली ही रेसर बाईक Yamaha R15 ला टक्कर देईल. या बाईकची किंमत 1.85 लाख रुपये आहे.
केटीएम इंडियाने त्यांची नवीन स्पोर्ट्स बाईक KTM RC 160 भारतीय बाजारात लाँन्च केली असूनतिची सुरुवातीची किंमत 1.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. KTM RC 160 ची डिझाइन RC200 बाईकने प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहे. त्यात समान एलईडी हेडलाइट आणि डेटाइम रनिंग लाइट्स सेटअप आहे, यामुळे ही बाईक रेसिंग बाईकसारखी दिसते.
KTM RC 160 मध्ये 164 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 19 हॉर्सपॉवर आणि 15.5 एनएम टॉर्क निर्माण करते. ही पॉवर 6-स्पीड गिअरबॉक्सद्वारे मागील चाकामध्ये पाठवली जाते. या बाईकचा टॉप स्पीड 118 किमी/प्रतितास आहे. तिच्या उत्कृष्ट पॉवर-टू-वेट रेशोमुळे ही बाईक तिच्या श्रेणीतील एक मजबूत स्पर्धक बनते.
RC 160 ला मजबूत ट्रेली फ्रेमवर बनवलेल्या या बाइकला पुढच्या बाजूला 37 मिमी इन्व्हर्टेड फोर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आलाय. ब्रेकसाठी पुढे 320mm आणि मागे 230mm डिस्क ब्रेक देण्यात आलेत. यासह ड्यूल चॅनल ABS देखील आहेत. बाइकमध्ये LCD इंस्ट्रूमेंट क्लस्टर पूर्णपणे LED लाइटिंग आणि असिस्ट आणि स्लिपर क्लस सारखे फीचर्सही देण्यात आलेत.
भारतीय बाजारात KTM RC 160ची स्पर्धा थेट Yamaha R15 बाईकशी असेन. या बाईकची किंमत 1.66 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. जरी R15 स्वस्त आहे, तरी अधिक शक्ती आणि रेसिंग लूकमुळे RC 160 बाईक अधिक तरुणांना आकर्षित करू शकते. KTM RC 160 चा स्पोर्टी लूक, शक्तिशाली इंजिन आणि रेसिंग फील हव्या असलेल्या रायडर्ससाठी बेस्ट बाईक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.