खुशखबर! बाईक घेणाऱ्यांसाठी खास संधी, Yamaha च्या 'या' व्हेरियंटवर जबरदस्त सवलत, वाचा किंमत

Yamaha R15 Price Cut: यामाहाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त R15 सिरीजवर ₹5,000 पर्यंतची सूट जाहीर करण्यात आली असून स्पोर्ट्स बाईक चाहत्यांसाठी ही ऑफर विशेष आकर्षक ठरणार आहे.
Yamaha R15 Price Cut
Yamaha R15 GOOGLE
Published On

नव्या वर्षाची सुरुवात काही लोक विविध नव्या वस्तू घेऊन करतात. त्यातच फार वर्षांपासून नव्या वर्षात गाड्या विकत घेण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. तुम्ही जर नवी बाईक विकत घेण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. यामाहा मोटर कंपनीच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त इंडिया यामाहा मोटरने आपल्या लोकप्रिय R15 सिरीजवर खास अॅनिव्हर्सरी ऑफर जाहीर केली आहे. या विशेष उपक्रमाअंतर्गत यामाहा R15 सिरीजवर तब्बल ५,००० रुपयांची किंमत बचत देण्यात येत असून ही ऑफर ५ जानेवारीपासून लागू होणार आहे.

वर्धापन दिन साजरा करणाचा भाग म्हणून R15 सिरीजची सुरुवातीची किंमत आता १,५०,७०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी करण्यात आली आहे. यामुळे यामाहाच्या स्पोर्ट्स मोटरसायकल्स जास्त ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत मिळेल.

Yamaha R15 Price Cut
High Cholesterol: शरीराच्या 'या' भागात दिसतात कोलेस्टेरॉल वाढल्याची गंभीर लक्षणं, वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी दिला सल्ला

लॉन्चपासूनच यामाहा R15 ने भारतातील एंट्री-लेव्हल परफॉर्मन्स मोटरसायकल सेगमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रेस-केंद्रित डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दैनंदिन वापरासाठी योग्य राइडिंग अनुभव यामुळे या बाईकला तरुण वर्गाकडून मोठी पसंती मिळाली आहे. भारतात आतापर्यंत एक दशलक्षहून जास्त युनिट्सचे उत्पादने पूर्ण करत R15 ही बेस्ट ठरली आहे.

यामाहा R15 सिरीजमध्ये १५५ सीसी क्षमतेचे लिक्विड-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले असून ते दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखले जाते. यामाहाचे प्रोप्रायटरी DiASil सिलिंडर तंत्रज्ञान आणि प्रसिद्ध डेल्टाबॉक्स फ्रेममुळे या मोटरसायकलची कार्यक्षमता आणि हाताळणी जास्त प्रभावी ठरणार आहे.

या सिरीजमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, असिस्ट अँड स्लिपर क्लच, निवडक व्हेरिएंट्समध्ये क्विक शिफ्टर, अपसाइड-डाऊन फ्रंट फोर्क्स तसेच लिंक-टाइप मोनोक्रॉस सस्पेन्शनसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ट्रॅक-प्रेरित डिझाइन आणि रेसिंग डीएनए यामुळे यामाहा R15 सिरीज आजही भारतातील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी आणि परफॉर्मन्स-केंद्रित मोटरसायकल्सपैकी एक मानली जाते.

किंमतींबाबत बोलायचे झाल्यास, यामाहा R15 S ची एक्स-शोरूम दिल्लीतील किंमत १,५०,७०० रुपये ठेवण्यात आली आहे. यामाहा R15 V4 ही मोटरसायकल १,६६,२०० रुपयांना उपलब्ध असून, टॉप व्हेरिएंट असलेल्या यामाहा R15 M ची किंमत १,८१,१०० रुपये इतकी आहे. ७०व्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेली ही विशेष ऑफर यामाहा प्रेमी आणि परफॉर्मन्स बाइक चाहत्यांसाठी नक्कीच आकर्षक ठरणार आहे.

Yamaha R15 Price Cut
Dal Benefits: कोणत्या आजारात कोणत्या डाळी ठरतील योग्य? न्यूट्रिशनिस्टनी सगळ्या शंका केल्या दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com