Dal Benefits: कोणत्या आजारात कोणत्या डाळी ठरतील योग्य? न्यूट्रिशनिस्टनी सगळ्या शंका केल्या दूर

Nutrition Advice: हृदय, पीसीओएस आणि मधुमेह यांसारख्या आजारांमध्ये कोणती डाळ फायदेशीर ठरते? न्यूट्रिशनिस्टनी दिलेल्या सल्ल्यामुळे सर्व शंका दूर होतील.
Nutrition Advice
Diabetes controlSAAM TV
Published On

सध्या सगळ्यांच्याच खाण्यापिण्याचा पद्धतीत बदल झाले आहेत. काहींना दैनंदिन आयुष्यात फक्त जंक फूड्स खावे लागतात. याचा नक्कीच तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. जेव्हा आपण आजारी पडतो. तेव्हा आपण अचानक घरचं खाणं पसंत करतो. पण कोणत्या आजारात कोणते पदार्थ खातोय आणि ते योग्य आहेत का? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. पुढे आपण एका न्यूट्रिशनिस्टनी सोशल मीडियावर दिलेला सल्ला जाणून घेणार आहोत. त्यामध्ये कोणत्या आजारात कोणत्या डाळी फायदेशीर ठरतील? याची माहिती दिली आहे.

१. हरभऱ्याची डाळ

तज्ज्ञांची मते हरभऱ्याची डाळ प्रत्येकाच्या शरीरासाठी फायदेशीर असते. विशेष म्हणजे जे लोक हृदयाच्या समस्यांनी ग्रस्त असतात. यालाच चणा डाळ म्हणतात. याचं सेवन रोजच्या आयुष्यात केल्याने पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम हे महत्वाचे घटक तुम्हाला मिळतील. याने तुमच्या ह्रदयाचं कार्य सुधारतं, वजन कमी होतं. हाय कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबामुळे जेव्हा हृदयावर ताण येतो, तेव्हा चण्याच्या डाळीचा समावेश आहारात करू शकता.

Nutrition Advice
Mangalsutra Designs: कॉटन साडीवर कोणत्या स्टाइलचं मंगळसूत्र घालावं?

२. मुग डाळीचे सेवन

मुग डाळ ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. पण ज्या महिलांना पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे. त्या महिलांसाठी ही डाळ जास्त फायदेशीर ठरते. असं तज्ज्ञ सांगतात. कारण पोटासाठी ही डाळ उत्तम आहे. जी पचायला खूप हलकी असते. याने हार्मोन्सचा बॅलेन्स करण्यास मदत होते.

३. मसूर डाळीचे सेवन

सध्या भारतात एक कॉमन झालेला आजार म्हणजेच डायबेटीज. या आजाराच्या रुग्णांसाठी मसूर डाळ फायदेशीर असते. कारण यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतं. याने साखरेचं रक्तात शोषण हळू-हळू होतं आणि अचानक साखर वाढण्याचा धोका कमी होतो. फायबरमुळे रक्तातल्या साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.

तुम्ही या सगळ्या डाळी रोजच्या आयुष्यात सेवन करू शकता. पोटाच्या समस्या, जसं की पोटफुगी, आम्लपित्त किंवा पोट ताट झाल्यासारखं जाणवत असेल तर डाळीची निवड जास्त काळजीपूर्वक करावी लागते. अशा वेळी जड डाळी पचनसंस्थेवर ताण देऊ शकतात. त्यामुळे पोटासाठी हलकी अशी मूग डाळ खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. या डाळीत अँटी-न्यूट्रिएंट्स कमी प्रमाणात असल्याने पोषक घटक सहज शोषले जातात आणि पचनसंस्थेवर जास्त भार पडत नाही.

टीप

ही माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टवर आधारित असून, ती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही आहारातील बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Nutrition Advice
High Cholesterol: शरीराच्या 'या' भागात दिसतात कोलेस्टेरॉल वाढल्याची गंभीर लक्षणं, वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी दिला सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com