Sakshi Sunil Jadhav
कॉटन साडी ही रोजच्या वापरासाठी, ऑफिस किंवा साध्या कार्यक्रमांसाठी महिलांची पहिली पसंती असते. मात्र साडी जितकी साधी तितकंच मंगळसूत्राचं योग्य स्टायलिंग महत्त्वाचं असतं.
साध्या कॉटन साडीसोबत हलकं आणि कमी डिझाइन असलेलं ब्लॅक बीड्स मंगळसूत्र परफेक्ट दिसतं. रोजच्या वापरासाठी हा उत्तम पर्याय आहे.
खूप जड नको असेल तर मॅट किंवा सॉफ्ट गोल्ड फिनिश मंगळसूत्र निवडा. ऑफिस लूकसाठी हे मंगळसूत्र शोभून दिसतं.
प्रिंटेड किंवा प्लेन कॉटन साडीवर फ्लोरल पॅटर्नचं मंगळसूत्र ट्रेंडी आणि फ्रेश लूक देतं.
कॉटन साडीवर लांब मंगळसूत्रापेक्षा नाजूक छोटं मंगळसूत्र जास्त एलिगंट वाटतं. नेकलाईनही छान दिसते.
पारंपरिक कॉटन साडीवर टेंपल डिझाइनचं मंगळसूत्र खूप उठून दिसतं. कारण ते लांबूनच ठळक दिसतं.
हलके डायमंड किंवा स्टोन टच असलेलं मंगळसूत्र साध्या साडीला स्टायलिश लूक देतं.
ब्लॅक बीड्ससोबत थ्रेड डिझाइन असलेलं मंगळसूत्र ट्रेंडी आणि कम्फर्टेबल पर्याय आहे.
छोटं आणि साधं पेंडंट असलेलं मंगळसूत्र कॉटन साडीच्या सादेपणाला उठावदार लुक देतं.
साडीच्या बॉर्डर किंवा प्रिंटच्या रंगाशी मॅचिंग असलेलं मंगळसूत्र लूक अधिक सुंदर बनवतं.