Pune Crime news  Saam Tv
क्राईम

Pune Crime: श्रावणात मटण अन् दारूसाठी मुलाचा हट्ट, संतापलेल्या बापाने घेतला जीव; पुण्यातील भयानक घटना

Pune Police: पुण्यामध्ये ३० वर्षीय तरुणाची वडिलांनी हत्या केली. श्रावणात मटण खाण्यावरून झालेल्या वादात वडिलांनी मुलाला मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला.

Priya More
  • पुण्यात श्रावणात मटण मागितल्याने मुलाची हत्या

  • वारजे माळवाडीत वडिलांकडून मुलाला बेदम मारहाण

  • मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू

  • पोलिसांकडून आरोपी वडिलांना अटक

  • मुलाच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आईलाही अटक

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये वडिलांनी पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना घडली. श्रावणात दारू पिऊन घरी आला आणि मटणासाठी हट्टा करणाऱ्या मुलाला वडिलांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील वारजे माळवाडी भागात ही धक्कादायक घटना घडली. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मुलाची हत्या करणाऱ्या वडिलांना आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मदत करणाऱ्या आईला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

श्रावणात दारु पिऊन घरी येऊन मटणाचे जेवण मागितल्याने वडील आणि मुलामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात वडिलांनी मुलाला मारहाण केली या मारहाणीत महेश भागवत गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी महेशच्या भावाने पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी महेशचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४ वर्षे) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६० वर्षे) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ ऑगस्ट रोजी वारजे माळवाडी भागातील रामनगर परिसरात रात्री १०.३० ते पहाटे ४ वाजताच्यादरम्यान घडली. फिर्यादी हे वारजे भागात पेंटिंगचे काम करतात. त्यांचे आई-वडील आमि लहान भाऊ शेजारी राहतात. त्यांचा लहान भाऊ महेश याचा १० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र कुठला कामधंदा करत नसल्याने आणि दारूचे व्यसन असल्याच्या कारणाने त्याची बायको त्याला सोडून निघून गेली होती. त्याची बायको आणि दोन मुलं हे माहेरी राहतात. काही दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये घटस्फोट सुद्धा झाला.

महेश एकटा राहत असून तो जेवणासाठी आईवडिलांकडे जात असे. काहीच कामधंदा करत नसल्याने आणि सतत दारू पिऊन येत असल्यामुळे वडिलांचे त्याच्यासोबत सतत भांडणे होत होते. दारु पिऊन घरी आल्यावर तो जेवणासाठी कायम मांसाहार मागायचा. सध्या श्रावण महिना सुरु असल्याने घरी मांसाहार बनवून देत नसल्याने त्यांच्यात अनेकवेळा वाद झाला. २४ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजण्याचा सुमारास महेश नेहमीसारखं दारु पिऊन घरी आला. यावेळी त्याने मटणाचे कालवण करून देण्याची मागणी घरी केली. मात्र श्रावण सुरू असल्याने घरात मांसाहार करत नसल्याचे सांगितल्यानंतर सुद्धा त्याने हट्ट धरला.

या हट्टाचे रूपांतर वादावादीमध्ये झाले. यावेळी त्याच्या वडिलांनी महेशच्या तोंडावर आणि डोक्यावर जबर मारहाण केली. या मारहाणीत महेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या मुलाचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे कळताच आईला धक्का बसला. पण तिने आपल्या नवऱ्याला मदत केली. नवऱ्याला वाचवण्यासाठी तिने पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केली. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; ज्येष्ठ नेत्याचं निधन, राजकारणात शोककळा

Maharashtra News Live Update: हातात जीआर मिळाला की आंदोलन मागे घेऊ, आंदोलक विद्यार्थ्यांनी स्पष्ट सांगितले

Rose Water Benefits for Skin: ३० दिवस रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा गुलाब पाणी; होतील 'हे' सुंदर बदल

Housing Society : बिल्डिंगमध्ये नवं घर घेण्यापूर्वी 'हे' महत्त्वाचे ७ नियम माहितीच पाहिजेत, नाहीतर बसेल भुर्दंड

रोज एका दिवसाला किती केळी खावीत?

SCROLL FOR NEXT