diyva waghmare saam tv
क्राईम

Parbhani Crime News : नव्या दुचाकीसाठी सासरच्या मंडळींकडून त्रास, विवाहितेने उचललं टाेकाचं पाऊल; पूर्णा पाेलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल

पूर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विवाहितेस पती व सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असे. त्यातूनच त्यांनी टाेकाचे पाऊल उचलले अशी तक्रार दिव्या यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

Siddharth Latkar

Parbhani :

परभणी जिल्ह्यात एका विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आहे. हुंड्याचे उर्वरित पैसे आणि नवीन दुचाकीसाठी महिलेस त्रास दिला जात असल्याने तिने टाेकाचे पाऊल उचलले. दिव्या वाघमारे (20) असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती पूर्णा पाेलिसांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पूर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिव्या वाघमारे यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यांना त्यांचे पती व सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असे. त्यातूनच त्यांनी टाेकाचे पाऊल उचलले अशी तक्रार दिव्या यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

या तक्रारीनूसार दिव्या वाघमारे यांचे पती आणि त्यांच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. पूर्णा पाेलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान दिव्या वाघमारे यांच्या निधनाने परिसरात शाेककळा पसरली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT