Pimpari Chinchwad News Saamtv
क्राईम

Pimpari Chinchwad Fraud: परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक; हिंजवडी पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

गोपाल मोटघरे

Pimpari Chinchwad Fraud:

परदेशात नोकरी आणि राहण्याची व्यवस्था करून देतो असं बेरोजगार तरुणांना स्वप्न दाखवून लुटणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय प्रताप सिंग, किसन देव पांडे, हेमंत सिताराम पाटील आणि किरण अर्जुन राऊत अशी बेड्या ठोकलेल्या टोळीतील आरोपीचे नाव आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विजय सिंग, किसन पांडे आणि हेमंत पाटील या तिन्ही आरोपींनी मिळून कस्तुरी चौकाजवळील आयकॉन टावर या ठिकाणी ब्ल्यू ओसियन मरीन कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या माध्यमातून या आरोपींनी ब्रुनेई देशाचा बनावट शिक्के तयार करुन, त्या देशाचे बनावट वर्कऑर्डर देखील तयार केले होते.

आपल्या देशातील बेरोजगार तरुणांना ब्रुनेई देशात वेल्डर, ड्रायव्हर आणि प्लंबरचे जॉब लावून देतो म्हणून उमेदवारांकडे लाखो रुपये वसूल केले होते असे पोलीस तपासात उघडकीस आला आहे. या टोळीतील आरोपींनी पूर्णानगर येथील युनिक प्रिंटर्स अँड झेरॉक्स दुकानाचे मालक किरण अर्जुन माने यांच्याकडून नेग्रा ब्रुनेई दारुसंलाम देशाचे बनावट शिक्के तयार करून घेतले होते असे देखील पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 125 व्यक्तींचे पासपोर्ट जप्त केले आहेत. बनावट विजा आणि वर्क ऑर्डर तयार करणारी टोळी अवघ्या काही दिवसात आपलं ऑफिस बंद करून पळून जाण्याच्या बेतात असताना हिंजवडी पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच मनीष कन्हैयालाल स्वामी यांच्या तक्रारीवरून हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

SCROLL FOR NEXT