Maharashtra Politics : महाविकास आघाडीत बिघाडी? नाशिक लोकसभा जागेवर ठाकरे गटानंतर शरद पवार गटाचा दावा

Maharashtra Political News : नाशिकच्या लोकसभा जागेवर शरद पवार गटाने दावा केला आहे. यामुळे या मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Maha Vikas Aghadi
Maha Vikas AghadiSaam tv
Published On

अभिजीत सोनवणे, नाशिक

Nashik Political News :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील काही लोकसभेच्या जागांवर आघाडीतील घटकपक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी देखील हजेरी लावली. आगामी लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपावरील चर्चेदरम्यान, नाशिकच्या लोकसभा जागेवर शरद पवार गटाने दावा केला आहे. यामुळे या मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Latest Marathi News)

देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येत्या दोन महिन्यानंतर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे संकेत बहुतांशी राजकीय नेत्यांनी दिले आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघावर हेवेदावे सुद्धा सुरु झाले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maha Vikas Aghadi
Kalyan MNS News: मराठी पाट्या लावा अन्यथा..., कल्याणमध्ये मनसे आक्रमक, 27 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम

नाशिकच्या लोकसभा मतदरासंघाच्या जागेवर शरद पवार गटाने दावा केला आहे. शरद पवार गटाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. याचदरम्यान, शरद पवार गटाने नाशिकच्या जागेवर दावा करत आमचा उमेदवार निवडून येईल, असा दावा देखील केला आहे.

Maha Vikas Aghadi
Maharashtra Politics: विकासावर बोला, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका; आदित्य ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावरुन शिंदे गटाचे टीकास्त्र

नाशिकच्या लोकसभा मतदारसंघावर शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंकळे यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने नाशिक लोकसभेसाठी मागील २ महिन्यांपासून तयारी केली आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी वरिष्ठाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. या जागेवरून पुढील काही दिवसांत नाशिकच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, अशी माहिती शरद पवार गटाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com