Ratan Tata Dream Project : रतन टाटा यांचं ड्रीम प्रोजेक्ट तयार, 165 कोटी रुपये खर्च करून प्राण्यांसाठी बांधलं रुग्णालय

Ratan Tata Pet Project: रतन टाटा यांचं ड्रीम प्रोजेक्ट अखेर तयार झालं आहे. टाटा ट्रस्ट भारताचे पहिले अत्‍याधुनिक स्मॉल एनिमल हॉस्पिटल मुंबईच्या महालक्ष्मी एरियात सुरू करणार आहे.
Ratan Tata Dream Project
Ratan Tata Dream ProjectSaam Tv
Published On

Ratan Tata Pet Project:

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं ड्रीम प्रोजेक्ट अखेर तयार झालं आहे. टाटा ट्रस्ट भारताचे पहिले अत्‍याधुनिक स्मॉल एनिमल हॉस्पिटल मुंबईच्या महालक्ष्मी एरियात सुरू करणार आहे. हे रूग्णालय ५ मजल्यांचे असून २०० रूग्‍णांची क्षमता असलेल्‍या ९८००० चौ. फूटांचा परिसरात पसरलेले आहे. हे रूग्णालय मार्च २०२४ ला सुरू होणार आहे.

याचबद्दल बोलताना रतन टाटा, म्हणाले की, “पाळीव पशू हे आपल्या कुटुंबाचा भाग आहेत आणि त्यांचा जीव प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाचा असतो. मी आजुबाजूला पाहिले तेव्हा मला लक्षात आले की, भारतात पाळीव प्राण्यांसाठी सुविधा खूप कमी आहेत. भारतासारख्या मोठ्या देशात जिथे पाळीव प्राण्यांची संख्या खूप मोठी आहे. तिथे आपल्याला त्यांचे जीव वाचवून त्यांना चांगले जीवनमान देण्यासाठी सुविधा उपलब्ध का नसावी, याचे मला आश्चर्य वाटले. स्मॉल एनिमल हॉस्पिटलचे ध्येय प्रत्येक प्राण्याला करूणा, प्रेम आणि मानवी दृष्टीकोनातून उपचार देण्यासाठी स्पेशलाइज्ड सुविधांसह रूग्णालय बनण्याचे आहे.” (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ratan Tata Dream Project
Mauris Noronha: घोसळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला तिसऱ्या व्यक्तीने संपवलं?, ठाकरे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा

या उपक्रमाबाबत बोलताना, चीफ व्हेटर्नरी ऑफिसर, एडव्हान्स्ड व्हेटर्नरी केअर फॅसिलिटी (एसीव्हीएफ) डॉ. थॉमस हीथकोट म्हणाले की,“भारतातील एक आघाडीची सेवाभावी संस्था म्हणून आम्ही मानवी आरोग्य आणि पशु आरोग्य यांच्यातील आंतरसंबंधी लिंक्स जाणतो आणि देशात पशु आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. (Latest Marathi News)

ते म्हणले, हे टप्प्याटप्प्याने सुरू होणारे हॉस्पिटल सल्ला ते निदान ते उपचार, उत्तम दर्जाची नर्सिंग सेवा आणि पशुंच्या समस्यांचे निवारण अशा विविध भागांमध्ये सर्वांगीण अद्ययावत आरोग्यसेवा देईल. आगामी काही महिन्यांमध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम दर्जाच्या पशुवैद्यकीय संस्था असलेल्या रॉयल व्हेटरनरी कॉलेज, लंडनसोबत सर्वांगीण प्रशिक्षण उपक्रम चालवण्याचे नियोजन करत असून शहरातील एक सर्वांगीण व्हेटरनरी वातावरणाला प्रोत्साहन देऊ.”

Ratan Tata Dream Project
Maharashtra Politics: विकासावर बोला, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका; आदित्य ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावरुन शिंदे गटाचे टीकास्त्र

मिळालाय माहितीनुसार, हे हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने (BMC) टाटा ट्रस्टच्या एडव्हान्स्ड व्हेटरनरी केअर फॅसिलिटीला (एसीव्हीएफ) महालक्ष्मी येथे दिलेल्या एक एकर जमिनीवर स्थित आहे. हे उद्घाटन टप्प्याटप्याने सुरू करताना पहिल्या दिवशी इमर्जन्सी अँड क्रिटिकल केअर- 24x7 चाचणी आणि उपचार सेवा; आंतररूग्ण आणि आयसीयू युनिट्स (आयसोलेशन युनिट्ससह); सर्जिकल सेवा (सॉफ्ट टिश्यू सर्जरी, ऑर्थोपेडिक्स इत्यादी.); फार्मसी सेवा; निदान- रेडिओलॉजी आणि इमेजिंग (एमआरआय, एक्सरे, सिटी स्कॅन आणि यूएसजी) यांच्यासारख्या सहाय्यभूत सेवा, प्रयोगशाळा- हेमाटोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सायटोलॉजी, क्लिनिकल पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, हिस्टो पॅथॉलॉजी आणि एनेस्थेशिया सुरू केल्या जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com