ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर मॉरिस भाईला कोणत्या तरी तिसऱ्याच व्यक्तीने संपवलं, अशी शंका ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी व्यक्त केली आहे.
यासोबतच आमदार देशमुख यांनी एक मोठा आरोप केलाय आहे. आपण जेव्हा एकनाथ शिंदे सोबत सुरतला गेलो तेव्हा आपला 'गेम' करण्याचं षडयंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रचलं होतं, असा गंभीर आरोप अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.
ही माहिती शिंदे गटाच्या एका आमदारानेच आपल्याला दिल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे. सत्ता स्थापनेत आपला अडथळा होणार असल्याने आपला 'गेम' करण्याचा प्लॅन रचला गेल्याचा आमदार नितीन देशमुखांचा आरोप आहे. यातूनच आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या गेल्याचा आमदार देशमुख यांचा दावा आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळीबार करून हत्या करण्यात आली. मॉरीस नोरोन्हो या व्यक्तीने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या आणि नंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली, असं सांगितलं जात आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, मॉरिसने गुरुवारी रात्री त्याच्या बोरिवलीच्या आय सी कॉलनीतील कार्यालयामध्ये हळदी-कुंकू आणि साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्याने अभिषेक घोसाळकरांना देखील आपल्या कार्यालयात बोलावलं. घुसाळकरांबरोबर त्याने कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर सुरुवातीला फेसबुक लाईव्ह केले आणि त्यादरम्यानच त्याने घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडल्या. ज्यात घोसाळकर यांचा मृत्यू झाला. नंतर त्यानेही आपलं जीवन संपवलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.