Who Is Abhishek Ghosalkar: कोण आहेत अभिषेक घोसाळकर? ज्यांचा दहिसरमधील गोळीबारात मृत्यू झाला

Abhishek Ghosalkar Death In Firing: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा आज दहिसर येथे गोळीबारात मृत्यू झाला आहे.
Who Is Abhishek Ghosalkar
Who Is Abhishek GhosalkarSaam Tv
Published On

Who Is Abhishek Ghosalkar:

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा आज दहिसर येथे गोळीबारात मृत्यू झाला आहे. मॉरीस नोरोन्हो या व्यक्तीने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. नंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. गोळीबार झाल्यानंतर अभिषेक घोसाळकर यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोण आहेत अभिषेक घोसाळकर?

अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. विनोद घोसाळकर यांनी 2009 ते 2014 या कालावधीत मुंबईतील दहिसर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही काम केले आहे. अभिषेक घोसाळकर हेही माजी नगरसेवक होते. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Who Is Abhishek Ghosalkar
Abhishek Ghosalkar Death: गोळीबारात ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, पोलीस उपआयुक्त रोशन यांनी दिली माहिती

नेमकं काय घडलं? (What Exactly Happened with Abhishek Ghosalkar)

मिळालेल्या माहितीनुसार, मॉरिस भाईने गुरुवारी रात्री त्याच्या बोरिवलीच्या आय सी कॉलनीतील कार्यालयामध्ये हळदी-कुंकू आणि साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्याने अभिषेक घोसाळकरांना देखील आपल्या कार्यालयात बोलावलं होतं. (Latest Marathi News)

कोण आहे मॉरिस भाई? (Who is Mauris Bhai)

अभिषेक घुसाळकरांबरोबर त्याने कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर सुरुवातीला फेसबुक लाईव्ह केले आणि त्यादरम्यानच त्याने घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडल्या. लाईव्ह सुरू असतानाच गोळ्या लागताच घोसाळकर कोसळले. दरम्यान, मॉरिस भाई हा स्थानिक गुंड असून त्याच्या विरोधात 420 च्या म्हणजेच अनेक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Who Is Abhishek Ghosalkar
School Timing Change: मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता 'या' वेळेत भरणार 4 थी पर्यंतचे वर्ग

मॉरिस भाई विरोधात एक बलात्काराचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि त्या प्रकरणी तो अनेक महिने तुरुंगात होता. काही आठवड्यांपूर्वीच मॉरिस भाई तरुंगातून बाहेर आला होता. ज्याप्रकारे अभिषेक घोसाळकरांना बोलून फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्यावरून हे सगळं सुनियोजित असल्याचं पोलिसांना संशय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com