PHD Paper Leak Saam TV
क्राईम

PHD Paper Leak: सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या...; PHD पेपर फुटीनंतर राज्यात विद्यार्थी आक्रमक

Ruchika Jadhav

Paper Leak News:

महाज्योती, सारथी आणि बार्टी परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात पेपर फुटल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांनी गोंधळ सुरू केलाय. पीएचडी फेलोशिपसाठी होणारा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

विद्यार्थ्यांनी वारंवार होणाऱ्या पेपर फुटीवर संताप व्यक्त केलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर फुटलेला असल्याने परीक्षेवर देखील बहिष्कार केला आहे. या घटनेमुळे कमला नेहरु विद्यालयात एकच गोंधळ पाहायला मिळतोय. विद्यार्थी परीक्षेला गेले तेव्हा त्यांना देण्यात आलेल्या काही प्रश्नपत्रिकांना सील नव्हते. विद्यार्थ्यांना मिळालेला पेपर प्रिंटेड नव्हाता. तसेच पेपर xerox काढलेला होता, अशी तक्रार विद्यार्थी करत आहेत.

पेपरला सील नसल्याने पेपर न घेता सरसकट सर्वांना फेलोशिप देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यात एकीकडे अजित पवार PHD करून काय दिवे लावणार आहे का? असे म्हणत असतील तर यांनी किमान पेपरला सील लावावे असा प्रतिप्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे. दुरवरून आलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा हा फटका बसल्याने अजूनही गोंधळ सुरू आहे.

नागपुरसह छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील विद्यार्थ्यांकडून आंदोलन केलं जात आहे. परीक्षा रद्द झाल्याशिवाय केंद्र सोडणार नाही, असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. PHD च्या विद्यार्थ्यांना बार्टी, सारथी,महाज्योतीच्या वतीने फेलोशिप दिली जाते. त्या फेलोशिपसाठी पात्रता परीक्षा आज होती. यातून उत्तीर्ण झालेल्या २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाणार होती. मात्र आता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

SCROLL FOR NEXT