Police officials inspecting the spot at Jawala Murar village in Nanded district after four members of a family were found dead. x
क्राईम

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Nanded Crime News: मुखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आलेत. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी या घटनेमागील प्राथमिक कारण उघड केले आहे.

Bharat Jadhav

  • नांदेड जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

  • दोन तरुणांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

  • आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले

नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील एका गावातील एकाच घरातील चार जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील दोन मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. तर, या घटनेबाबत माहिती मिळताच घरी त्यांचे आई-वडील देखील मृतावस्थेत आढळलेत. या घटनेने गावकरी आणि पोलीस प्रशासनही चक्रावून गेलेत.

मिळालेल्या माहितीनुसार मृत कुटुंबाचे आडनाव लखे होतं. कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडालीय. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर नांदेड पोलीस अधीक्षकांनी या घटनेतील मृत व्यक्तींच्या आत्महत्येचं कारण सांगितलं. नांदेडच्या जवळा मुरार गावात चौघांच्या आत्महत्येची घटना घडली. विशेष म्हणजे आत्महत्या केलेल्यांमध्ये दोन तरुण वयाची मुले होती.

या मुलांनी रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवलं. गावात जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी भेट दिली. या घटनेतील मृतांच्या घराची पाहणी केली. यात काही घातपात आहे का याची तपासणी पोलिसांनी केली. मात्र आजारपण आणि आर्थिक तणावातून ही घटना घडली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी माध्यमांना दिली आहे.

मृतांची नावे

उमेश रमेश लखे, वय 25 वर्षे (मुलगा)

बजरंग रमेश लखेस वय 22 वर्षे (मुलगा)

रमेश सोनाजी लखे, वय 51 वर्षे (वडील)

राधाबाई रमेश लखे, वय 45 वर्षे (आई) गावातील रमेश लखे आणि राधाबाई लखे यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले तर त्यांच्या उमेश अन रमेश या दोन मुलांचे मृतदेह मुगट इथल्या रेल्वे रुळावर आढळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेस एकटी, पुण्यात दादांमुळे मविआत बिघाडी

SCROLL FOR NEXT