Nandurbar Crime: शिक्षकी पेशाला काळीमा! आश्रमशाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून बलात्कार

Headmaster Physically Abused Class 8 Student : विद्यार्थिनीवर मुख्याधापकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीय. शासकीय आश्रम शाळा तलाईच्या मुख्याध्यापकसह वस्तीगृहाच्या व्यवस्थापिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Headmaster Physically Abused Class 8 Student
Police investigation underway after a serious crime reported in a government ashram school in Nandurbar.saamtv
Published On
Summary
  • नंदुरबारमधील शासकीय आश्रम शाळेत गंभीर गुन्ह्याची घटना

  • इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून अत्याचाराचा आरोप

  • मुख्याध्यापकासह वस्तीगृह व्यवस्थापिकेवर गुन्हा दाखल

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यपकाचा हैवानी चेहरा समोर आलाय. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ही संतापजनक घटना नंदुरबारात घडलीय. मुख्याध्यापकाने तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाची माहिती विद्यार्थिनीने आई-वडिलांना सांगितली त्यानंतर त्यांनी धडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Headmaster Physically Abused Class 8 Student
Crime: मुलीला शेतात खेचत नेलं, तिघांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय आश्रम शाळा तलाईच्या मुख्याध्यापकसह वस्तीगृहाच्या व्यवस्थापिकेवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. नराधम मुख्याध्यापकाचे नाव रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवी आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान देणाऱ्या शिक्षकच असे हैवान असतील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण होतोय. आदिवासी शाळांमधील विद्यार्थीं अत्याचाराचे बळी ठरत आहेत. त्यामुळे आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

Headmaster Physically Abused Class 8 Student
Latur Crime : लातूर हादरलं! पत्नीनेच नवऱ्याचा जीव घेतला, भिंतीवर आपटून केली हत्या

ही घटना उघडल्यानंतर आदिवासी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण निर्मण झालंय. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. तर या घटनेनं आदिवासी आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com