संदीप भोसले, लातूर प्रतिनिधी
Ahmedpur police murder investigation Latur : सतत दारू पिऊन त्रास देणाऱ्या नवऱ्याची बायकोने हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली. अर्चना गायकवाड असं आरोपी महिलेचे नाव आहे, तर मृत पतीचे नाव प्रशांत असे आहे. लग्नानंतर नवरा दारू पिऊन सतत त्रास द्यायचा, मारायचा त्यामुळे अर्जना माहेरी गेली होती. पाच वर्षानंतर घरी परतल्यानंतरही नवऱ्याची सवय अन् स्वभाव बदलला नाही.त्यामुळे रागाच्या भरात पत्नीने नवऱ्याचा गळा आवळला, त्यानंतर भिंतीवर आपटून जीव घेतला. त्यानंतर नवरा दारू पिऊन मृत्यू झाल्याचा बनाव रचला. पण पोलिसांनी अर्चनाचा भंडाफोड केला.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात पत्नी अर्चना गायकवाड हिला अटक करण्यात आली आहे. अर्चना गायकवाड हिने पती प्रशांत गायकवाड याची गळा दाबून अन् भिंतीवर आपटून हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. प्रशांत आणि अर्चना यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. याच वादातून अर्चना अनेक दिवस माहेरी गेली होती.
अर्चना संसार करण्यासाठी माघारी परतली तरीही नवऱ्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाहीच. दारू पिऊन तो सतत मारायचा, त्यामुळे रागाच्या भरात अर्चनाने नवऱ्याचा खून केला. अन् बेशुद्ध अवस्थेत पती पडल्याचा बनाव रचला.मात्र पोलीस तपासात भिंतीवर आपटून, गळा आवळत हत्या केल्याचं उघड झालं. याप्रकरणी पत्नी अर्चना गायकवाड हिला अहमदपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रशांत गायकवाड हा सतत दारूचे व्यसन करायचा आणि यामुळेच तो बेशुद्ध झाल्याची माहिती अर्चना गायकवाड हिने स्वतःच्या दिराला दिली. रुग्णालयात उपचारासाठी प्रशांत याला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत संशय बळवल्याने पोलिसांनी अधिकाचा तपास केला. त्यानंतर स्वत:च्या पत्नीनेच भिंतीवर डोके आपटून गळा आवळून हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाल आहे. दरम्यान या खुनाचा गुंता सोडवण्यासाठी पोलिसांना गोपनीय माहितीचा आधार देखील घ्यावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.