Manasvi Choudhary
मेथीचे दाणे आरोग्यासाठी गुणकारी मानले जातात. मेथीच्या दाण्याचा केसांसाठी उपयोग केला जातो.
मेथीच्या पाण्याने केस धुतले जातात. मेथीमध्ये प्रथिने, निकोटिनिक ॲसिड आणि लेसिथिन भरपूर प्रमाणात असते, जे केसांच्या अनेक समस्या मुळापासून दूर करतात.
जर तुमकचे तजर तुमचे केस खूप गळत असतील, तर मेथीचे पाण्याने केस धुवा केस गळती कमी होईल.
मेथीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. केसांतील कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही मेथी च्या पाण्याने केस धुणे फायदेशीर आहे.
मेथीच्या पाण्याने केस धुतल्याने केसांना नैसर्गिकरित्या चमक येते व केस मऊ, सिल्की होतात.
मेथीमध्ये लोहाचे आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. हे केसांमधील मेलॅनिन टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे केस पांढरे होत नाहीत.
रात्री एका वाटीमध्ये मेथीचे दाणे पाण्यात भिजत घाला. सकाळी ते पाणी थोडे उकळून गाळून केस धुण्यासाठी वापरा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.