Manasvi Choudhary
अनेकांना त्वचा काळी पडणाच्या समस्या असतात. चेहऱ्यावरची त्वचा काळी पडणाच्या समस्येने महिलासह अनेक पुरूष देखील त्रस्त आहेत.
अनेकदा चेहरा स्वच्छ दिसतो मात्र कपाळ काळवटलेले दिसते. कपाळावरचा काळेपणा दूर करण्यासाठी आज आम्ही तु्म्हाला सोप्या टिप्स सांगणार आहोत.
हळद ही चेहऱ्यासाठी गुणकारी मानली जाते. कपाळावरचा काळेपणा दूर करण्यासाठी हळदीचा लेप लावा.
काकडी कपाळावर लावल्याने कपाळावरचे टॅनिंग दूर होण्यास मदत होते.
बदाम तेलामध्ये असलेले व्हिटामिन्स त्वचेसाठी फायदेशीर आहे यामुळे त्वचा मऊ आणि सुंदर होते.
कच्चे दूध त्वचेवरील मळ काढण्यास मदत करते कच्चा दुधामध्ये गुलाबजल मिक्स करून तेल कपाळावर लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.