Manasvi Choudhary
चेहऱ्याला बर्फ लावण्याचे चांगले फायदे आहेत. पार्लरमध्ये चेहऱ्याला बर्फ लावून मसाज करतात ज्याला Ice Facial असे म्हणतात.
सकाळी उठल्यानंतर तसेच रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्याला बर्फ लावू शकता.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकदा चेहरा सुजल्यासारखा वाटतो अशावेळी तुम्ही बर्फाने शेक दिा तर चेहरा फ्रेश होतो.
बर्फामुळे त्वचेची छिद्रे तात्पुरती आकुंचन पावतात, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि गुळगुळीत दिसते. यामुळे मेकअप करण्यापूर्वी बर्फ लावल्यास मेकअप जास्त काळ टिकतो.
जर तुम्हाला वारंवार पिंपल्स येत असतील किंवा चेहऱ्यावर लालसरपणा असेल, तर तुम्ही बर्फाने शेक द्या फायद्याचे राहील.
बर्फ लावल्यामुळे त्वचेखालील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते व त्वचेला नैसर्गिक रित्या चकाकी येते.
बर्फ कधीही थेट त्वचेवर लावू नका. तो नेहमी एका स्वच्छ सुती रुमालात गुंडाळून मगच चेहऱ्याला लावावा.