संतापजनक! आधी वडील, काका नंतर शेजारच्या आजोबानं १२ वर्षीय मुलीला वासनेचा बळी बनवलं, धक्कादायक कृत्यानं गावच हादरलं

Akola Crime: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका १२ वर्षीय मुलीवर तिच्या स्वतःच्या वडिलांनी, काकाने आणि शेजारील आजोबाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
A grim scene outside the Telhara Police Station in Akola district where officials registered a case under POCSO and BNS against three individuals for the repeated sexual abuse of a 12-year-old girl.
A grim scene outside the Telhara Police Station in Akola district where officials registered a case under POCSO and BNS against three individuals for the repeated sexual abuse of a 12-year-old girl.Saam Tv
Published On

अक्षय गवळी, अकोला

विदर्भातील अकोला जिल्ह्यातून धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. जन्मदात्या पित्याने 12 वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर उघडकीस झाला आहे. सुरुवातीला वडिलांकडून मग काकाने आणि त्यानंतर शेजारी राहणाऱ्या आजोबाने देखील या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केले. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या अडसूळ गावातील ही घटना आहे.

A grim scene outside the Telhara Police Station in Akola district where officials registered a case under POCSO and BNS against three individuals for the repeated sexual abuse of a 12-year-old girl.
CCTV Video : भावजय नगरसेवक कशी झाली? विजयी उमेदवाराच्या घराबाहेर कोयत्याने हल्ला, बीड पुन्हा हादरले

दरम्यान, या धक्कादायक प्रकरणाचं गांभीर्याने पाहता तेल्हारा पोलिसांनी तत्काळ दखल घेत कुटुंबातीलच 2 आणि आजोबा विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान, त्रास सहन न झाल्यानं मुलीनं अखेर शाळेतील शिक्षकांसमोर वडिलांसह इतरांची तक्रार मांडली होती. त्यानंतर हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.

A grim scene outside the Telhara Police Station in Akola district where officials registered a case under POCSO and BNS against three individuals for the repeated sexual abuse of a 12-year-old girl.
Shocking : मुख्याध्यापकांच्या जाचाला कंटाळून १० वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; शाळेच्या आवारात संपवलं जीवन

दरम्यान, गावातील शाळेतील मुख्याध्यापकांसमोर या पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार सांगितला. तिचं म्हणणं ऐकल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. त्याचवेळी चाईल्ड लाईनच्या महिला अधिकाऱ्यांकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान चाईल्ड लाईन आणि शाळेतील मुख्याध्यापक गणेश ठाकरे यांनी घटनेचे गांभीर्य पाहता तातडीने तेल्हारा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी देखील हे प्रकरण तितकच गांभीर्याने घेतलं.

A grim scene outside the Telhara Police Station in Akola district where officials registered a case under POCSO and BNS against three individuals for the repeated sexual abuse of a 12-year-old girl.
Kidney Trafficking : चंद्रपूर किडनी प्रकरणात दुसर्‍या आरोपीला अटक; चीन कनेक्शन आले समोर

मुख्याध्यापकाच्या तक्रारीनंतर वडीलांसह काका आणि शेजारी राहणाऱ्या एका म्हाताऱ्यावर गुन्हे दाखल केले. अपराध क्रमांक 382/25 कलम 64(2)(f),(m), 65(1) BNS सह 4,6,8 बाल संरक्षण कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल झाले. तेल्हारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडील आणि काका गेल्या सहा अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करत होते. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी वडील आणि शेजारी राहणाऱ्या आजोबाला अटक केली आहे.

अत्याचार करणाऱ्या शेजारील आजोबाचं नाव गजानन भोम असं आहे. तर नराधम काका हा फरार आहे, तो मागील 20 दिवसांपासून पुणे येथे आहे. दरम्यान मुलीचं वय 12 वर्ष 8 महिने 22 दिवस असून ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिचं वारंवार लैंगिक शोषण केलंय. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com