Kandi Pedha Recipe: सणासुदीला यावेळी घरच्या घरी बनवा साताऱ्यातील पारंपारिक कंदी पेढे, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

कांदी पेढ्यासाठी लागणारे साहित्य

कांदी पेढा बनवण्यासाठी खवा (मावा), साखर पावडर, वेलची पूड, थोडंसं तूप आणि सजावटीसाठी पिस्ता किंवा बदाम लागतात. हे साहित्य पेढ्याला खास चव आणि सुगंध देते.

Small Pedha | yandex

खवा भाजून घ्या

सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तूप गरम करून त्यात खवा मंद आचेवर हलवत भाजून घ्या. खव्याचा रंग हलका सोनेरी झाला आणि सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा.

Kandhi Pedha | Saam Tv

साखर आणि वेलची पूड मिसळा

भाजलेला खवा थोडा थंड झाल्यावर त्यात साखर पावडर आणि वेलची पूड घालून चांगलं मिसळा. यामुळे पेढ्याला गोडवा आणि सुगंध मिळतो.

Pedha | yandex

मिश्रण मळून घ्या

सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर हे मिश्रण हलकं हाताने मळून घ्या. मिश्रण मऊ आणि एकजीव झालं की पेढे बनवण्यासाठी तयार होतं.

Pedha | yandex

पेढ्यांना आकार द्या

मिश्रणाचे छोटे गोळे करून हाताने हलकं दाबून पेढ्यांचा गोल आकार द्या. हवे असल्यास पेढ्यांवर हलका डिझाईनही करू शकता.

Pedha

ड्रायफ्रूट्सने सजावट करा

प्रत्येक पेढ्यावर पिस्ता किंवा बदामाचे काप लावल्याने पेढे अधिक आकर्षक दिसतात आणि चवही वाढते.

Pedha | Saam tv

सर्व्ह करण्यासाठी तयार

तयार कांदी पेढे काही वेळ फ्रिजमध्ये ठेवल्यास ते अधिक छान सेट होतात. त्यानंतर हे स्वादिष्ट पेढे सण किंवा खास प्रसंगी सर्व्ह करू शकता.

Pedha | Saam tv

Ghagra Choli Designs: लग्नसराईसाठी या ट्रेंडी आणि लेटेस्ट घागरा चोळी आहेत बेस्ट; तुम्ही दिसाल सगळ्यात ग्लॅमरस

Trendy Ghagra Choli Designs | Saam Tv
येथे क्लिक करा