Nagpur Crime News saam tv
क्राईम

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Nagpur Crime: नागपुरमध्ये बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवल्याची धक्कादायक घटना घडली. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे तिने हे धक्कादायक कृत्य केले. दोघांना पोलिसांनी अटक केली.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये एका महिलने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे नागपुरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली. आरोपी महिलेने नवऱ्याच्या हत्येला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हत्या झाल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपींनी हत्येची कबुली दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. नवरा सतत चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ करत होता. त्यामुळे अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने या महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. नवऱ्याच्या हत्येला आधी नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न तिने केला. मात्र पोस्टमॉर्टम अहवालातून हत्या असल्याचे समोर आले. ३८ वर्षीय चंद्रसेन रामटेके असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

चंद्रसेन रामटेके यांचे ३० वर्षीय दिशा रामटेकेसोबत १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायूचा झटका आला तेव्हापासून ते घरीच राहत होते. दिशा रामटेके घराचा खर्च भागविण्यासाठी पाण्याचे कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती. काही महिन्यांपूर्वी तिची आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला या दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चरचे काम करणाऱ्या व्यक्तीशी ओळख झाली.

दिशा आणि आसिफ यांच्या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. दिशांचे पती चंद्रसेन ४ जुलै रोजी घरी निपचित पडलेले दिसले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोस्टमॉर्टम अहवालात गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. तेव्हा पोलिसांनी शासकीय रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम कक्षाजवळ दिशाला बोलवून तिची चौकशी केली. तेव्हा तिने हत्येची कबुली दिली.

अनैतिक संबंधांची चंद्रसेनला माहिती मिळाली होती आणि त्यामुळे नवरा-बायकोंमध्ये सतत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे त्याला संपविण्याचा प्लॅन आखण्यात आल्याचे तपासातून समोर आलं. दिशा आणि आसिफ या दोघांनी चंद्रसेन यांचा गळा आवळला आणि नाक- तोंड दाबून धरले. श्वास गुदमरून तडफडून चंद्रसेन यांचा मृत् झाला. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मागणीची पूर्तता करणारा जीआर नाही; वकील असीम सरोदेंचं सखोल विश्लेषण|VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात बारा मेळा गणपतीचे आज विसर्जन

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?

Maratha Reservation: छगन भुजबळांच्या नाराजीवर सुनील तटकरे म्हणाले.. VIDEO

OBC Reservation: भाजपचे ४, शिवसेना-राष्ट्रवादीचे २- २ सदस्य; ओबीसी समाजाची उपसमिती काय काम करणार?

SCROLL FOR NEXT