Nagpur Crime : दुचाकीवर बसून मागे बसलेल्या तरुणीला मारहाण, गालावर चापट मारताच खाली पडली; नागपुरातील संतापजनक VIDEO

Beating a Young Woman Video : हा व्हिडिओ नागपुरात व्हायरल होत आहे. मात्र, ज्या पद्धतीने हा तरुण त्याच्या मागे बसणाऱ्या तरुणीला मारहाण करत आहे, त्यावर टीकाही केली जात आहे. ती तरुणी दुचाकीवरून खाली पडते.
Young woman beaten on a bike
Young woman beaten on a bikeSaam Tv News
Published On

पराग ढोबळे, साम टिव्ही

नागपूर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, नागपुरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दुचाकीवर बसलेल्या तरुणाकडून त्याच्या पाठीमागे बसणाऱ्या तरुणीला मारहाण करणारा व्हिडिओ सोशल माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. मारहाण करताना हा व्हिडिओ कोणीतरी शूट केला आणि तो सोशल माध्यमावर टाकला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? अजून स्पष्ट झालेलं नाही.

हा व्हिडिओ नागपुरात व्हायरल होत आहे. मात्र, ज्या पद्धतीने हा तरुण त्याच्या मागे बसणाऱ्या तरुणीला मारहाण करत आहे, त्यावर टीकाही केली जात आहे. ती तरुणी दुचाकीवरून खाली पडते. त्यानंतरही तिला मारहाण करतो. मात्र ती तरुणी मुकाट्याने सहन करत असल्याचं दिसून येत आहे. त्याचं काय नात आहे? हे स्पष्ट होत नाही. पण अशा पद्धतीने एका तरुणीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला पकडून कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेत दुचाकीच्या नंबर प्लेटवरून पोलीस या तरुणाचा शोध घेतील का? हे पाहावं लागणार आहे.

Young woman beaten on a bike
Kolhapur News : गळ्यात, पायात साखळदंड अन् कुलूप, दोन महिन्यांपासून महिलेला डांबलं; कोल्हापुरात भयंकर घटना उघड

बीडमध्ये तरुणाला मारहाण

दरम्यान, बीडमध्ये देखील पुन्हा मारहाणीची घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील आहेर वडगाव येथील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील आहेर वडगाव येथील तरुणाला मंदिरातच मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २७ मे रोजी ही घटना घडली असून व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माराहाण झालेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तर मारहाण झालेल्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भीमा राजाराम रोहिटे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. यासंदर्भात आशाबाई राजाराम रोहिटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com