Nagpur Hit And Run Case Update: 
क्राईम

Nagpur Hit And Run Case: आधी अपघात नंतर घातपात आता जादूटोणा; हिट अँड रन प्रकरणाला नवा अँगल

Bharat Jadhav

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूर: येथील बालाजी नगरमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात परत एक दुसरं वळण आलंय. संपत्तीसाठी सासऱ्याची हत्या करणाऱ्या अर्चना पुट्टेवार यांना सासरे जादूटोणा करत असल्याचा संशय होता. सासऱ्याने पतीवर जादूटोणा केल्याची माहिती आरोपी अर्चना पुट्टेवार यांनी पोलिसांना दिली.

आरोपीने पोलीस चौकशीत दिलेल्या या माहितीमुळे या प्रकरणाला वेगळा अँगल आलाय. आधी अपघात वाटणारी घटना नंतर घातपात असल्याची समजली आता हा प्रकार जादूटोणा असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान या प्ररकरणात अटकेत असलेल्या तिघांना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

जादूटोणामुळे हत्या झाली?

मे महिन्यात नागपूरमधील बालाजी नगरमध्ये एक अपघाताची घटना घडली होती. या अपघातात पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये हिट अँड रनची तक्रार करण्यात आली होती. याचा तपास करताना पोलिसांना हा घातपात असल्याचं समजलं. यात पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या शासकीय नोकरीला असलेल्या सूनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला.

सासऱ्याची २२ कोटी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी सूनेने सासऱ्याला संपवण्याचा प्लान आखला. यासाठी तिने नवऱ्याच्या चालकाला सव्वा कोटी रुपयांची सुपारी दिली होती. नागपूर पोलिसांनी याप्रकरणाचा उलगडा करत आरोपी सूनेसह तीन जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने या तिघांना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. याच दरम्यान याप्रकरणात नवा अँगल आलाय. सासरे पुरुषोत्तम हे पूजापाठ करायचे. त्यांना नवऱ्यावर जादूटोणा केला होता. म्हणून पती आपलं ऐकत नसल्याचा संशय अर्चना पुट्टेवार यांनी पोलीस चौकशीत सांगितलं.

काय म्हणाले पोलीस

अर्चना पुट्टेवार यांना सासरे हे पूजापाठ करत असल्याने ते जादूटोणा करत असल्याचा संशय होता. या संदर्भात त्या वारंवार पतीला सांगत, मात्र पती त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते. जादूटोणा केल्यामुळेच पती माझं ऐकत नाही, असा संशय अर्चना पुट्टेवार यांना होता. दरम्यान उच्चशिक्षित असलेल्या अर्चना यांचं वागणं पतीला आवडत नसल्याने तिच्या बोलण्याकडे पती दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातंय. उच्चशिक्षित मास्टमांइंड अर्चना स्वतःच्या बचाव करण्यासाठी असं बोलत असल्याचा संशयही व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अय्यो! तब्बल ६० लाख पगार, तरीही पुरत नाही, तरुणीने दुःख सांगितलं, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया| VIDEO

SL vs NZ 2nd Test: श्रीलंकेची आघाडी 500 पार.. न्यूझीलंडचा अवघ्या 88 धावांवर पॅकअप

Maharashtra News Live Updates: रेशन दुकानात प्लास्टिकचे तांदूळ आढळल्याचा प्रणिती शिंदे यांनी केला दावा

IAS Ayush Goyal : २८ लाखांची नोकरी सोडली, जिद्दीने UPSC ची तयारी, एका झटक्यात IAS झाला; आयुष गोयलची सक्सेस स्टोरी वाचाच

Chakli Recipe : कुरकुरीत आणि कमी तेलात फुलणारी चकली; वाचा परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT