Malawi Vice President Death: मलावीच्या उपराष्ट्रपतींसह ९ जणांचा विमान अपघातात मृत्यू

Malawi Vice President Saulos Chilima: मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा सोमवारी विमानाने प्रवास करत होते. उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा आणि इतर नऊ जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता झाले होते. शोध घेतल्यानंतर या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली.
Malawi Vice President Death: मलावीच्या उपराष्ट्रपतींसह ९ जणांचा विमान अपघातात मृत्यू
Malawi Vice President Saulos ChilimaSaam Tv
Published On

मलावी देशाचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा (Malawi Vice President Death) यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मलावीचे राष्ट्रपती लाजर चकवेरा यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. मलावीचे उपराष्ट्रपती सोलोस चिलिमा यांच्यासोबत विमानामध्ये ९ जण होते. या सर्वांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला.

बऱ्याच तासांच्या शोध मोहिमेनंतर बेपत्ता विमान चिकांगवाच्या जंगलात सापडले. या विमानातून प्रवास करणारे सर्वजण मृतावस्थेत आढळून आले. मलावी राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळाच्या कार्यालयाने या दुर्घटनेची माहिती देणारे औपचारिक निवेदन जारी केले. सॉलोस चिलिमा यांच्या मृत्यूनंतर मलावी देशाची जोरदार चर्चा होत आहे. मलावी देश कुठे आहे आणि हा देश कशासाठी प्रसिद्ध आहे ते जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्च केले जात आहे.

मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा सोमवारी विमानाने प्रवास करत होते. उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा आणि इतर नऊ जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली. हे विमान बेपत्ता झाल्यानंतर उत्तर मलावीच्या पर्वतीय जंगलात बऱ्याच तासांच्या शोध मोहीमेनंतर अपघातग्रस्त विमान सापडले. उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा, माजी फर्स्ट लेडी शैनिल डिझिम्बीरी आणि इतर आठ जणांना घेऊन विमान राजधानीतून निघाले होते. दक्षिण अफ्रिका देशाची राजधानी लिलोंग्वे येथून सोमवारी सकाळी ९.१७ वाजता हे विमान रवाना झाले होते. त्यानंतर हे विमान ४५ मिनिटांनंतर राजधानीपासून ३७० किलोमीटर लांब मजुजु आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. पण त्यापूर्वीच त्याला अपघात झाला.

Malawi Vice President Death: मलावीच्या उपराष्ट्रपतींसह ९ जणांचा विमान अपघातात मृत्यू
Modi 3 Cabinet Portfolio: एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप; नितीन गडकरीसह इतर कोणत्या नेत्याला कोणतं मिळालं खातं? जाणून घ्या संपूर्ण मंत्रिमंडळ

मजुजुमधील हवाई वाहतूक नियंत्रणाने या विमानाच्या पायलटला लँडिंगचा प्रयत्न न करण्याची आणि खराब हवामान आणि खराब दृश्यमानतेमुळे माघारी जाण्याची सूचना केली होती. पण एअर ट्रॅफिक कंट्रोलचा विमानाशी संपर्क तुटला आणि काही वेळातच ते रडारवरून गायब झाले. विमान अपघातानंतर मलावीच्या राष्ट्रपती कार्यालयाने विमानाचा शोध घेण्याचे आणि बचावकार्य करण्याचे आदेश दिले. या घटनेमुळे मलावीच्या नागरिकांना मोठा धक्का बसला.

Malawi Vice President Death: मलावीच्या उपराष्ट्रपतींसह ९ जणांचा विमान अपघातात मृत्यू
Pakistani Youtuber Shot Dead: भारत Vs पाकिस्तान मॅचवर बनवत होता व्हिडीओ, संतप्त सिक्योरिटी गार्डने युट्यूबरची गोळी झाडून केली हत्या

दरम्यान, २० मे २०२४ रोजी अशाच विमान अपघाताची घटना इराणमध्ये घडली होती. इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर अधिकाऱ्यांचा घेऊन जाणाऱ्या विमानाला अपघात झाला होता. यामध्ये या सर्वांचा मृत्यू झाला होता. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे विमानही अझरबैजानहून परतत असताना बेपत्ता झाले होते. परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दोल्लाहियान, इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर आणि इतर अधिकारी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये होते. इराणच्या राष्ट्रपतींसह सर्वांचाच या अपघातात मृत्यू झाला होता.

Malawi Vice President Death: मलावीच्या उपराष्ट्रपतींसह ९ जणांचा विमान अपघातात मृत्यू
Haryana politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा ट्विस्ट; हरियाणात काँग्रेस आणि 'आप'ची युती तुटली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com