Nashik News : १० लाख ४० हजार किंमतीचे मोबाईल गहाळ; पोलिसांनी दिलं सरप्राईज, 'त्या' लोकांनी आनंदाने उड्या मारल्या

Nashik Latest News : नाशिक शहर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल मिळवून देण्याचं कौतुकास्पद काम नाशिकमधील मुंबईनाका पोलिसांनी केलं आहे.
१० लाख ४० हजार किंमतीचे मोबाईल झाले गहाळ; पोलिसांनी दिलं सरप्राईज, 'त्या' लोकांनी आनंदाने उड्या मारल्या
Nashik News Saam tv
Published On

तबरेज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

नाशिक : शहर असो किंवा ग्रामीण आता बहुतेक व्यक्तीकडे मोबाईल असतो. व्यक्तीच्या उत्पन्नानुसार त्याच्याकडे मोबाईल असतो. तर दुसरीकडे शहर किंवा ग्रामीण भागातही मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ होऊ लागल्या आहेत. अशाच घटना नाशिक परिसरातही वाढल्या आहेत.

नाशिक परिसरात मोबाईल चोरणे आणि गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी रोजच विविध पोलीस स्टेशनला नोंदवल्या जातात. अशाच तक्रारी मुंबईनाका पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरी आणि गहाळ होण्याच्या अनेक तक्रारींची नोंद झाली होती. नागरिकांच्या तक्रारी सोडवत मुंबईनाका गुन्हेशोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख यांनी सी.इ.आय.आर प्रणालीद्वारे एकूण १० लाख ४० हजार रुपये किमतीचे एकूण ५० महागडे मोबाईल फोन शोधले.

१० लाख ४० हजार किंमतीचे मोबाईल झाले गहाळ; पोलिसांनी दिलं सरप्राईज, 'त्या' लोकांनी आनंदाने उड्या मारल्या
Nashik Breaking News: धक्कादायक! नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मृत माशांचा खच, नागरिकांचा संताप; कारण काय?

आज मंगळवारी पोलिसांनी मोबाईल फोन तक्रारदारांना मुंबईनाका पोलीस स्टेशन येथील वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते सोपवले. यामध्ये आयफोन, सॅमसंग, वनप्लस, रेडमी, विवो, ओप्पो, आयटेल, मोटो यांसारख्या महागड्या कंपन्यांचे मोबाईल आहेत.

मोबाईल गहाळ झाल्यानंतर अनेक जण पोलिसांत तक्रार करण्याचं टाळतात. एकदा मोबाईल गहाळ झाल्यास, पुन्हा मिळत नाही असं अनेकांचं मत असतं. मात्र, नागरिकांचं मत खोडून मुंबईनाका पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

१० लाख ४० हजार किंमतीचे मोबाईल झाले गहाळ; पोलिसांनी दिलं सरप्राईज, 'त्या' लोकांनी आनंदाने उड्या मारल्या
Nashik News : मुसळधार पावसाने महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटला; नाशिक शहरासह ८० गावांचा वीज पुरवठा खंडित

मुंबईनाका पोलिसांनी गहाळ झालेले जवळपास ५० मोबाईल तक्रारदारांना परत मिळवून दिले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारदारांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळवून दिले आहेत. मोबाईल पुन्हा मिळाल्यानंतर अनेकांना आनंद गगनात मावेनासा झाला. मोबाईल परत मिळवून दिल्यानंतर अनेकांनी नाशिक शहर पोलिसांचे आभार व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com