Nagpur Crime Saam Digital
क्राईम

Nagpur Crime : चोरीच्या प्रकरणात वाठोडा पोलिसांनी दोघांना केली होती अटक; तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Nagpur Crime News : नागपूरमधील वाठोडा पोलिसांनी दोन दरोडेखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजकिशोर भोसकर आणि मकसूद अहमद अशी दरोडेखोरांची नावं आहेत.

साम टिव्ही ब्युरो

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमधील वाठोडा पोलिसांनी दोन दरोडेखोरांना अटक केली होती.त्यांच्याकडून तीन लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.राजकिशोर भोसकर आणि मकसूद अहमद अशी आरोपींची नावं आहेत. या दोघांना चार ठिकाणी दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे.

वाठोडा पोलीसांच्या हद्दीत फिर्यादी कीर्ती द्वीवेदी कामा निमित्त घराबाहेर गेले होत्या.. हीच संधी साधत चोरटे कुलुप तोडून घरात शिरले. घरातील कपाट तोडलं आणि सोने-चांदीचे दागिने तसंच रोख रक्कम मुद्देमाल घेऊन पसार झाले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. याच प्रकरणात दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुरुवातीला काही माहिती दिली नाही, मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

त्याची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यामध्ये एक घरफोडीची आणि दोन दुचाकी चोरीची कबुली दिली. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून 4 गुन्हे उघडकीस आले. यात सोने, चांदीचे दागिणे आणि दोन मोटरसायकल एकूण तीन लाख 81 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये कोयता गँगची दहशत

SSC-HSC Exam Date : दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर; वाचा कोणता पेपर कधी? जाणून घ्या

बोईसरमध्ये दिवसाढवळ्या दरोड्याचा प्रयत्न; ज्वेलर्सवर गोळीबार, पाहा व्हिडिओ

Dark Underarms Home Remedies: डार्क अंडरआर्म्समुळे हात वर करायला लाज वाटते? या ७ टिप्स करतील तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह

मोठी बातमी! अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी

SCROLL FOR NEXT