कृषी केंद्र व्यापाऱ्यास मारहाण, घरावर दरोडा; 40 ताेळे दागिन्यांसह 22 लाखांची लूट

dacoity at krushi kendra trader home at kautha near nanded: या दराेड्यामुळे सध्या कंधार तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.
dacoity at krushi kendra trader home at kautha near nanded
dacoity at krushi kendra trader home at kautha near nandedSaam Digital

- संजय सूर्यवंशी

नांदेड जिल्ह्यातील काैठा येथे दरोडेखाेरांनी एका व्यापाऱ्याच्या घरावर दराेडा टाकल्याने गावात एकच खळबळ उडाली. या घटनेत व्यापा-याला मारहाण करून दराेडेखाेरांनी अंदाजे 35 ते 40 तोळे सोने, चांदी आणि 20 ते 22 लाख रुपयांची रोख रक्कम लुटली आहे. पाेलिस दराेडेखाेरांचा शाेध घेताहेत.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही घटना कंधार तालुक्यातील कौठा येथील कृषी केंद्र चालक असलेल्या व्यापाऱ्याच्या घरावर हा दरोडा पडला आहे. सुमारे सहा दरोडेखोरांनी ही लूट केली आहे.

dacoity at krushi kendra trader home at kautha near nanded
APMC Market Vashi: 'एपीएमसी'च्या पदपथावर बदामांचं पॅकिंग, प्रशासनाची डाेळेझाक? Video Viral

दराेडेखाेरांनी गॅस कटरच्या साह्याने लोखंडी गेट तोडले. घरात प्रवेश करताच त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केली. घरातील सोने, चांदी तसेच पैसे लुटले. हे दराेडेखाेर चार चाकीतून आले हाेते. संबंधित वाहनाचा आणि दराेडेखाेरांचा शाेध सुरु असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

dacoity at krushi kendra trader home at kautha near nanded
पर्यटकांनाे! आंबोली घाटात धबधबा पाहण्यासाठी जाणार आहात? वाचा नवा नियम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com