संजय राठोड, यवतमाळ | ता. १५ जून २०२४
शासनाने निर्बंध घालूनही राज्यातील विविध भागात अवैधरित्या वाळू तस्करी सुरूच असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी वाळू तस्करांची मुजोरी आणि दहशत पाहायला मिळत आहे. कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ले केल्याच्याही अनेक घटना घडत आहेत. अशीच एक घटना यवतमाळमधून समोर आली असून वाळू तस्करांनी तलाठी आणि कोतवालला बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाळू तस्करांकडून तलाठी आणि कोतवालला मारहाण केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. यवतमाळमधील दिग्रसच्या गांधीनगर येथे घडलेल्या या घटनेने घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या मारहाणीचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रेतीची वाहतूक करण्यास मनाई केल्याने तलाठी जयंत व्यवहारे व कोतवाल यांना ही बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या घटनेने दिग्रस तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दिग्रस पोलिसात दोघांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीमध्येही महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम या मुरुगवाडा- पांढरा समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्या असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.