Ratnagiri News: वाळू माफियांची दादागिरी! महिला उपजिल्हाधिकांऱ्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

Ratnagiri Breaking News: रत्नागिरीतील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे.
Ratnagiri News: वाळू माफियांची दादागिरी! महिला उपजिल्हाधिकांऱ्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल
Ratnagiri Breaking NewsSaamtv
Published On

रत्नागिरी, ता. ८ जून २०२४

राज्यातील विविध भागात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून कारवाईसाठी गेलेल्या शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याचेही प्रकार समोर घडत आहेत. अशीच धक्कादायक घटना रत्नागिरीमध्ये घडली असून उपजिल्हाधिकाऱ्यांवर वाळू माफीयांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रत्नागिरीतील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून वाळू चोरांनी त्यांच्यावर फावड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीमती गेडाम यांनीच या हल्लेखोराना पाणी पाजले.

रत्नागिरीतील मुरूगवाडा-पांढरा समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी हा प्रकार घडला. श्रीमती गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर वाळू चोरांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मंडल अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Ratnagiri News: वाळू माफियांची दादागिरी! महिला उपजिल्हाधिकांऱ्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल
Nandurbar Land collapsed: मोठी दुर्घटना टळली! चांदसैली घाटात दरड कोसळली; २ तासांपासून वाहतूक ठप्प

हर्षलता गेडाम या मुरूगवाडा-पांढरा समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी बीचवरील फोटो काढले. मात्र वाळू उपसा केल्याचे फोटो काढल्याचा संशय घेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान, या वाळू माफियांची हिंमत वाढली असून थेट अधिकाऱ्यांवर ते हल्ला करत आहेत. यावर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Ratnagiri News: वाळू माफियांची दादागिरी! महिला उपजिल्हाधिकांऱ्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल
Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात! ट्रॅव्हल्स- ट्रकची समोरासमोर धडक, १ जागीच ठार; ७ जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com