Mumbai Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: अनोळखी महिलेशी मैत्री, पत्नीला धोका, इस्टेट एजेंटला १० लाखाला लुटलं; मुंबईतील धक्कादायक प्रकरण!

Mumbai Crime News: तोतया पोलिसांनी याबाबत पत्नीला न सांगण्याचे आश्वासनही देऊन त्याबदल्यात 15 लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या तरुणाने आपल्या मित्राकडून त्यांना पैसे घेऊन दिले.

Gangappa Pujari

मुंबई, ता. २७ ऑगस्ट २०२४

अनोळखी महिलेशी ओळख आणि भेट मुंबईमधील एका विवाहित रियल इस्टेंट एजेंटला चांगलेच महागात पडले आहे. महिलेच्या भेटीनंतर तोतया पोलिसांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले असून याबाबत पत्नीला सांगू, अशी धमकी देत तब्बल १० लाख रुपये उकळल्याची घटना बोरिवली पश्चिममध्ये घडली. अंकित अग्रवाल असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत एमएचबी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनोळखी व्यक्तीशी मैत्री महागात पडली

याबाबत पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, अंकित अग्रवाल (वय, ४२) हा एमएचबी पोलीस ठाणे हद्दीमधील बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनी येथे राहतो. त्याच परिसरात फूड स्टॉल चालवणाऱ्या उषा शेट्टी नावाच्या महिलेशी त्याची ओळख होती. या उषा शेट्टी नावाच्या महिलेने अंकितची दुसऱ्या महिलेशी ओळख करून दिली, त्यानंतर अंकित आणि संबंधित महिलेची मैत्री झाली. 22 ऑगस्ट रोजी संशयित महिलेने अंकितला फोन करून उषा शेट्टीच्या घरी भेटण्यास सांगितले. अंकित महिलेला भेटण्यासाठी उषाच्या घरी गेला आणि दुपारी तीनच्या सुमारास उषाच्या घरातून निघून गेला.

तोतया पोलिसांनी १० लाखाला लुटलं!

उषाच्या घरातून बाहेर पडताच अचानक काही अंतरावर दोन अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आले, जे स्वत:ला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत होते. दोन्ही कथित पोलिस अधिकाऱ्यांनी अंकितला तो उषाच्या घरी भेटलेल्या महिलेशी अयोग्य वर्तन करत होता. जर त्याने हे त्याच्या पत्नीला सांगितले तर त्यांचे नाते तुटेल आणि गुन्हा दाखल होऊन त्याला अटक होईल, अशी धमकी दिली. या धमकीने घाबरलेल्या अंकितकडे या तोतया पोलिसांनी याबाबत पत्नीला न सांगण्याचे आश्वासनही देऊन त्याबदल्यात 15 लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या तरुणाने आपल्या मित्राकडून त्यांना पैसे घेऊन दिले.

पोलिसात गुन्हा दाखल

दरम्यान, या घटनेनंतर एस्टेट एजेंटने ज्या मित्राकडून त्याने पैसे घेतले होते, त्याला त्याने ही घटना सांगितली. मित्राच्या सांगण्यावरून अंकितने MHB पोलिसांशी संपर्क साधला. डीसीपी आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पीआय सुधीर कुडाळकर यांच्या पथकाने अंकितच्या जबानीच्या आधारे अज्ञात व्यक्तींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तीन आरोपींना अटक करण्यात आली. अयुब खान (42, रा. भाईंदर), जितेंद्र पटेल (56, रा. नायगाव) आणि सुदर्शन खंदारे (32, रा. भाईंदर) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलीस आता फूड स्टॉल चालवणाऱ्या उषा शेट्टी आणि संशयित महिलेचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT